26.1 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeRatnagiriदेवधे शाळेतील 'त्या' शिक्षकाची बदली विशेष सभेत कार्यवाही

देवधे शाळेतील ‘त्या’ शिक्षकाची बदली विशेष सभेत कार्यवाही

शाळेचा पोषण आहार कुजलेल्या व सडलेल्या अवस्थेत आढळून आला होता.

पालक आणि ग्रामस्थांच्या रेटधामुळे अखेर तालुक्यातील देवधे शाळा नं. १ चे शिक्षक मंगेश कदम यांची बुधवारी (ता. ८) शाळेतून बदली करण्यात आली आहे. त्यामुळे पालक आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले देवधे शाळा नं. १ चे शिक्षक मंगेश कदम यांच्या विरोधात देवचे पालक व आमस्थांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांच्या विरोधात गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी लांजा यांना निवेदन सादर केले होते. शाळेचा पोषण आहार कुजलेल्या व सडलेल्या अवस्थेत आढळून आला होता. असा आहार मुलांना देण्यात येत असल्याची बाब उघडकीस आल्यानंतर पालकांनी ऑक्टोबरपासून शाळा बंद आंदोलन करण्याचा ८ इशारा दिला होता, त्यानंतर शिक्षण विभागाकडून एक समिती नेमण्यात आली होती. या चौकशीदरम्यान शिक्षक कदम यांनी समितीसमोर उडवाउडवीची उत्तरे दिली होती.

कागदपत्रे तपासणीकरिता मागितले असता त्यांनी ती दिली नव्हती, कपाट उघडण्याससुद्धा त्यांनी मनाई केली. कारण, मुलांना शासनातर्फे बूट व मोजे देण्यात आले होते; परंतु फक्त बूट काहीच मुलांना देण्यात आले व मोजे एका कपाटात आढळून आले, असे पालकांनी सांगितले. तसेच मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शाळेला शासनातर्फे चार व देवधे ग्रामपंचायतीकडून दोन असे सहा कॅमेरे प्राप्त झाले आहेत; मात्र ते बंद स्थितीत आढळले होते. वारंवार सांगूनही शिक्षक कदम यांनी ते चालू केलेले नाहीत. शिवाय मुख्य कार्यालयात, स्वयंपाकघर अशा ठिकाणीसुद्धा कॅमेराचा वापर केला नसल्याचे पालकांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर पालक आणि ग्रामस्थ यांनी आक्रमक भूमिका घेत शिक्षक कदम यांची शाळेतून तत्काळ बदली न झाल्यास शाळा बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर बुधवारी सकाळी पालकांनी मुलांना शाळेत पाठवले नव्हते.

प्रशासनाकडून दखल – या प्रकरणाची दखल घेत बुधवारी केंद्रप्रमुख सुधीन चव्हाण यांनी देवधे ग्रामपंचायतीच्या विशेष सभेत कदम यांना पदमुक्त केल्याचे जाहीर केले. या सभेला विस्तारअधिकारी चंद्रकांत पावसकर उपस्थित होते. सदर शिक्षकाची बदली पन्हळे शाळानंबर १ मध्ये करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मुलांना शाळेत पाठवण्याचे आवाहन केले. कदम यांना पदमुक्त केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनानुसार, पालकांनी दुपारी दोननंतर मुलांना शाळेत पाठवले.

RELATED ARTICLES

Most Popular