जिल्हा परिषदांच्या बिंदुनामावली पोर्टलवर अपलोड झाल्यावरच शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या या राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या बिंदुनामावल्या अद्ययावत होऊन बदली पोर्टलवर अपलोड झाल्यानंतरच होतील, असे ग्रामविकास विभागाकडून सांगितले जात आहे. प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांसह जिल्हांतर्गत ऑनलाईन बदल्याही आहेत. होणार त्यामुळे प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्यांत होणारा मोठा भ्रष्टाचार थांबणार असल्याचे मत जिल्ह्यातील शिक्षक व्यक्त करत आहेत.
आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्या या नवीन शिक्षक भरतीसाठी थांबवल्या आहेत. भरतीप्रक्रिया झाल्यानंतर शिक्षकांच्या बदल्या पूर्वीप्रमाणे होणार आहेत. आंतरजिल्हा बदल्या या सर्व जिल्हा परिषदांच्या बिंदुनामावली अद्ययावत होऊन बदली पोर्टलवर अपलोड झाल्यानंतर होणार आहेत. आंतरजिल्हा बदलीसाठी पोर्टलवर अर्ज केलेल्या शिक्षकांना अर्जात बदल करण्यासाठी संधी देण्यात येणार आहे. यामुळे अंतिम बिंदुनामावलीनुसार जिल्हा परिषदांकडील वाढलेल्या रिक्त पदावर राज्यातील बदली इच्छुक शिक्षकांना बदलीने जाता येणार आहे. जिल्ह्याचा शैक्षणिक दर्जा हा चांगला ठेवण्यासाठी राज्यशासन पावले टाकत आहे.
अनेक वर्षे जिल्हा परिषद शिक्षकभरती न होऊ शकल्याने रिक्त पदांची संख्या वाढत आहे. त्यात दरवर्षी आंतरजिल्हा बदल्यांची भर पडत आहे. या वर्षी तर ७१५ शिक्षक परजिल्ह्यात पाठवण्यात आले आहेत. दरवर्षी आंतरजिल्हा बदल्या वादात पडतात. त्याला ऑनलाईन बदल्यांमुळे रोख लागेल, अशा आशा व्यक्त केली जात आहे.