26.2 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

मुहूर्ताच्या दिवशी पावसाचा खोडा केवळ २० टक्के नौका समुद्रात

शुक्रवारपासून मासेमारीवरील बंदी उठल्यानंतर पहिल्याच दिवशी स्थानिक...

“आम तो आम और गुटली का भी दाम” असा हा प्रकल्प : अनिकेत सुर्वे

"आता वाटद दशक्रोशीतील युवकांनी निर्धार केला आहे,...

स्मार्ट वीजमीटरचा निर्णय रद्द करायला लावू – लियाकत शाह

स्मार्ट वीजमीटर बसवल्यानंतर वाढीव वीजबिले येत असल्याच्या...
HomeRatnagiriकोकण ते मुंबई प्रवास व्हाया कराड कोल्हापूर

कोकण ते मुंबई प्रवास व्हाया कराड कोल्हापूर

मुंबई-गोवा महामार्गावरील वाशिष्ठी नदीवरील पूल नुकत्याच आलेल्या महापुरामुळे खचला होता. यामुळे आठ-दहा दिवस वाहतूक पूर्णपणे बंद होती. यानंतर तांत्रिक तपासणी करून आणि पुलाची तात्पुरती डागडुजी करून वाहतूक सेवा पुन्हा सुरू करण्यात आली, परंतु त्यानंतर पूल पुन्हा खचल्याने अखेर पुन्हा दुरुस्ती करून वाहतूक पूर्ववत सुरु करण्यात आली.

चिपळूणचे माजी सभापती, पर्यावरणप्रेमी शौकत मुकादम यांनी चिपळूण शहरातील बहादूर शेख नाक्या नजीकच्या मुंबई-गोवा महामार्गावरील वाशिष्ठी पुलावरून सध्या वाहतूक सुरू असून अवजड वाहतूक रात्री बंद करण्यात आली आहे. दिवसाचे मोठे अवजड कंटेनर येथून वाहतूक करत असतात. यामुळे पुलाला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला असल्याने अवजड वाहतूक कराड किंवा कोल्हापूर मार्गे वळवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

शिवाय अवजड वाहतूकीसाठी वेळ सुद्धा ठरवून देण्यात आले असून, ते सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. अवजड वाहतूक रात्री पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु दिवसभरामध्ये  अनेक कंपन्यांचे मोठ्या प्रमाणातले माल वाहतूक अवजड कंटेनर या पुलावरूनच वाहतूक करत असल्याने, पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते. दररोज होणाऱ्या या अनेक तासांच्या वाहतूक कोंडीला स्थानिक ग्रामस्थ वैतागले आहेत.

त्यामुळेच एकतर पर्यावरणाची हानी होऊ नये यासाठी पर्यावरण प्रेमी श्री. शौकत मुकादम यांनी अशा प्रकारे होणाऱ्या अवजड वाहनांच्या वाहतुकीने पुलालाही धोका संभवत असल्याचे निदर्शनास आणून दिले आणि पर्यायी मार्ग म्हणून मुंबईकडे जाणारी आणि मुंबईतून येणारी वाहतूक कराड आणि कोल्हापूरमार्गे सुरू ठेवावी,  अशी मागणी केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular