27.6 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

आरजू टेस्कोल फसवणूक, संचालकांविरुद्ध दोषारोपपत्र

आरजू टेस्कोल कंपनीविरोधात गुंतवणकूदारांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात...

रत्नागिरी शहराचे वाटोळे करणाऱ्यांना घरी बसवा – बाळ माने

रत्नागिरी शहराच्या विकासाचा रोडमॅप भाजपकडे तयार आहे....

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...
HomeRatnagiriजूनमध्ये विविध वृक्षलागवड संकल्प

जूनमध्ये विविध वृक्षलागवड संकल्प

दापोली विधानसभा मतदार संघाचे आमदार योगेश कदम हे निसर्गाच्या संदर्भीय सगळ्याच गोष्टींमध्ये कायम पुढाकार घेऊन सक्रीय झालेले दिसतात. पर्यावरणाचा समतोल राखणे आणि त्याचे संरक्षण करणे हे सर्वस्वी आपल्या हातात असते. पर्यावरण समतोल राखण्यासाठी आमदार योगेश कदम यांनी दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्याचे योजिले आहे.

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून यावर्षी १ महिना हा वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये शासकीय यंत्रणेसह, शिवसैनिक आणि युवा सैनिकांचादेखील महत्वाचे योगदान राहणार आहे. महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्याचा मानस असल्याचा त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय महामार्ग, कोस्टल हायवे, प्रमुख जिल्हा मार्ग, जिल्ह्याला जोडणारे इतर जोड मार्ग, राज्य महामार्ग इतर ग्रामीण मार्गावर नियोजनबद्ध वृक्ष लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला असल्याचं आम. कदम यांनी सांगितले. या व्यतिरिक्त ज्या शासकीय, वनविभाग, ग्रामपंचायत कार्यालय, महिला बालकल्याण शाखा, बीडीओ कार्यालय अथवा खाजगी जागा आहेत तिथे सुद्धा परवानगीने नवनवीन वृक्षांची लागवड करण्याचे ठरविले आहे. कृषी उत्पन्न समिती आणि पणन महामंडळे यांच्या द्वारे राबविण्यात येणाऱ्या योजना, पिकेल तो विकेल अंतर्गत राज्य शासनाची हळद लागवड, तसेच लाल आणि काळा तांदूळ बियाण्याचा पुरवठा शेतकर्यांना उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणे सुरु केलेले आहे.

त्यामुळे राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या जन्मदिनी या वृक्ष लागवड उपक्रमाचा श्री गणेशा करण्याचे ठरविले आहे. १ महिन्यामध्ये जास्त प्रमाणात आणि उपयुक्त झाडांची लागवड केल्याने एक पर्यावरण पूरक वातावरण निर्माण होईल.

RELATED ARTICLES

Most Popular