25.6 C
Ratnagiri
Wednesday, September 18, 2024

परप्रांतीय हायस्पिड ट्रॉलरच्या घुसघोरीला चाप – मत्स्य विभाग

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी हद्दीमध्ये मोठ्या...

पूर नियंत्रणासाठी लवकरच बैठक – खासदार नारायण राणे

चिपळुणातील पूर नियंत्रणावर मोठे काम करायचे आहे....

रत्नागिरी रेल्वेस्थानकाचे बदलतेय रूपडे…

कोकण रेल्वेमार्गावरील प्रमुख रेल्वेस्थानकांचे रूपडे बदलत आहे....
HomeMaharashtraचहा तारी त्याला कोण मारी !

चहा तारी त्याला कोण मारी !

अहमदनगर येथील दोन तरुण मुकुंद बसवे आणि त्याचा मित्र मुकुंदच्या वडिलांना आणण्यासाठी गाडीने कल्याण मुंबईला निघाले होतेत. संध्याकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान गाडी माळशेज घाटामध्ये आली असता, पावसाळी वातावरणामुळे दोघांना चहा पिण्याची तल्लफ आली आणि त्यांनी आपली गाडी रस्त्याच्या कडेला पार्क करून, कारमधून उतरुन जवळच्या चहाच्या दुकानजवळ गेले, आणि अचानक त्यांच्या गाडीवर मोठी दरड कोसळली.

माळशेज घाटामध्ये पावसाळ्याच्या हंगामामध्ये दरडी कोसळण्याचे सत्र कायम सुरूच असते. दरवर्षी काही प्रमाणामध्ये दरडी कोसळण्याच्या घटनाची नोंद केली जाते. माळशेज घाट परिसरामध्ये सतत तीन दिवसांपासून पडणाऱ्या धुवांदार पावसामुळे दरड कोसळल्याची दुर्घटना घडली, परंतु हे दोन तरुण गाडीपासून लांब असल्याने या अपघातातून वाचले, या दुर्घटनेमध्ये गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परंतु, म्हणतात न सर सलामत तो पगडी पचास तसेच मुकुंद बसवे आणि त्याचा मित्र चहा पिण्यासाठी गाडीतून उतरल्याने त्यांचा जीव वाचला. गाडी रस्त्याच्या कडेला पार्किंग केल्याने घाटातील वाहतुकीवर त्याचा परिणाम जाणवला नाही. परंतु, माळशेज घाटात कारवर दरड कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणा त्वरित घटनास्थळी पोहोचले आणि युद्ध पातळीवर कामाला सुरुवात करून ती दरड हटवली.

landslide in malshej

काही जणांना चहाचे फार व्यसन असते, जेवण नसले तरी चालेल पण चहा मात्र हवा. आणि सध्या पावसाळी मोसम, गारठा असल्याने चहा दिवसातून ३-४ वेळा होतोच. या मित्रांचा काळ आला होता पण चहा मुळे ती वेळ टळली, “चहा तारी त्याला कोण मारी“ याचा चांगलाच अनुभव या दोघा मित्रांना आला. नाहीतर काहीतरी जीवितहानी घडण्याची शकयता नाकारता आली नसती.

RELATED ARTICLES

Most Popular