27.3 C
Ratnagiri
Thursday, December 18, 2025

रत्नागिरी रेल्वेस्थानकात तिकीट विक्रीत काळा बाजार

रत्नागिरी रेल्वेस्थानक येथे तत्काळ तिकीटविक्री ठिकाणी काळ्या...

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचा हिरमोड

राज्यातील महानगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम सोमवारी जाहीर झाल्यानंतर...

‘नो रोड, नो वोट !’ संगमेश्वरातील संभाजीनगरचा संतापाचा उद्रेक

संगमेश्वर तालुक्यातील संभाजीनगर येथील ग्रामस्थांचा संयम अखेर...
HomeRatnagiriसीएनजी पंपाच्या व्होल्टेज प्रॉब्लेमने त्रस्त रिक्षा व्यावसायिकांची महावितरणवर धडक

सीएनजी पंपाच्या व्होल्टेज प्रॉब्लेमने त्रस्त रिक्षा व्यावसायिकांची महावितरणवर धडक

तासनतास लाइन मध्ये उभे रहावे लागत असल्याने व्यवसायाचे नुकसान होत होते.

संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथील सीएनजी पंपामध्ये गेले वर्षभर कमी व्होल्टेज मुळे गॅस पुरवठा सुरळीत होत नसल्याने येथील रिक्षाव्यवसाईक चांगलेच त्रस्त झाले आहेत. अखेर बुधवारी रिक्षा मालक-चालक संघटना कडवई तुरळ चिखलीचे अध्यक्ष मिलिंद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील रिक्षा व्यवसाईकांनी महावितरण कम्पनीच्या संगमेश्वर कार्यालयावर आपला मोर्चा वळवला. यावेळी प्रभारी उपकार्यकारी अभियंता फारूक गवंडी यांनी चर्चेअंती ८ दिवसात योग्य त्या उपाययोजना करून वीजपुरवठा सुरळीत चालू करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले. धामणी येथील सीएनजी पंपावर गेले वर्षभर सकाळी ८ ते दुपारी १२ यावेळेत व्होल्टेज कमी असल्याने सीएनजी चा कॉम्प्रेसर लोड घेत नसल्याने सीएनजी पुरवठा बंद रहात होता. त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत होता. ऐन सिझनच्यावेळी हातावर पोट असणाऱ्या रिक्षाव्यावसाईकांना तासनतास लाइन मध्ये उभे रहावे लागत असल्याने व्यवसायाचे नुकसान होत होते. धामणी सिएनजी पंपाच्या व्यवस्थापनाकडून गेले वर्षभर याबाबत महावितरण कंपनीच्या संगमेश्वर कार्यालयाकडे पत्रव्यवहार करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते.

अखेर या त्रासाला कंटाळलेल्या कडवई, तुरळ, चिखली, माखजन, आरवली, कुंभारखाणी येथिल रिक्षा संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मिलिंद चव्हाण यांच्या नेतृवाखाली महावितरण कम्पनीच्या संगमेश्वर कार्यालयावर धडक दिली. यावेळी प्रभारी उप कार्यकारी अभियंता फारूख गवंडी यांच्याशी चर्चा करण्यात आली. गवंडी यांनी महावितरण च्या समस्या मांडल्या तसेच यासाठी महानगर गॅस कंपनीच्या कॉम्प्रेसर चे सेटिंग कमी करून त्यांनी ही आपल्याला सहकार्य करावे महावितरण कम्पनीच्या ज्या त्रुटी असतील त्या येत्या ८ दिवसांत वीजपुरवठा सुरळीत केला जाईल असे आश्वासन गवंडी यांनी दिल्याने रिक्षा व्यवसाईकांनी समाधान व्यक्त करत आभार मानले. उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रतीक सुर्वे, राजेंद्र यादव, सचिन हेमन, प्रकाश खाडे, सुनील गागरंकर, दिनेश गुरव, सुनील गुरव आदी रिक्षा संघटनेचे पदाधिकारी दीपक भोसले. उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular