27.1 C
Ratnagiri
Wednesday, July 30, 2025

महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणानेच दोघांचा मृत्यू

तालुक्यातील निवळी शिंदेवाडीकडे जाणाऱ्या पायवाटेवर महावितरणच्या हलगर्जीपणामुळे...

वकिल असल्याचे सांगून लांज्यात एकाला घातला गंडा

वकील असल्याचे सांगून आसगे मांडवकरवाडी येथील एका...

कुंभार्ली घाटाची अकरा कोटी खर्चुनही दुरवस्थाच…

कुंभार्ली घाटरस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागील दोन वर्षांत ११...
HomeRatnagiriकोकण मार्गावर तुतारी एक्स्प्रेस चोरट्यांच्या 'हिटलिस्ट' वर !

कोकण मार्गावर तुतारी एक्स्प्रेस चोरट्यांच्या ‘हिटलिस्ट’ वर !

दिवाणखवटी रेल्वेस्थानक चोरट्यांनी 'टार्गेट' केले आहे.

कोकण मार्गावर रेल्वेगाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या विशेषतः महिलांच्या सुरक्षिततेचे पुरते धिंडवडे निघत आहेत. महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावण्याचे सत्र पुन्हा सुरू झाल्याने सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. कोकण मार्गावरून घावणारी तुतारी एक्सप्रेस चोरट्यांच्या ‘हिटलिस्ट’वर आहे. तालुक्यातील दिवाणखवटी रेल्वेस्थानक चोरट्यांनी ‘टार्गेट’ केले आहे. दोन महिन्यात या एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या तब्बल सहा महिलांच्या गळ्यातील सोन्याची मंगळसूत्रे हिसकावत चोरट्यांनी ७ लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला. यापूर्वी चोरट्यांनी जलद गतीने धावणाऱ्या कोकणकन्या एक्सप्रेसला ‘लक्ष्य’ केले होते. कोकण मार्गावरून धावणाऱ्या कोकणकन्या एक्सप्रेसमधून महिलांचे दागिने हिसकावण्याचे प्रकार थांबलेले असतानाच चोरट्यांनी आता तुतारी एक्सप्रेसला ‘लक्ष्य’ केले आहे. मुंबईहून कोकणात येणारी तुतारीएक्सप्रेस पहाटेच्या सुमारास क्रॉसिंगसाठी दिवाणखवटी रेल्वेस्थानकाजवळ थांबते. याचदरम्यान, प्रवाशी विशेषतः महिला गाढ झोपेत असतात. हीच संधी साधत चोरटे महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून पोबारा करतात.

दिवाणखवटी स्थानकाजवळ पलायनासाठी अनेक मार्ग देखील असल्याचे समोर आले आहे. रेल्वेस्थानका लगतच जंगलमय भागही असल्याने दागिने लांबवल्यानंतर याच जंगलातून चोरटे पसार होत असल्याचे समजते. यामुळे चोरट्यांचा सुगावा लागत नसल्याची बाबतही सम ोर आली आहे. दोन महिन्यात तुतारी एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या चार महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून पोबारा केला. या चारही घटना दिवाणखवटी रेल्वेस्थानकाजवळ तुतारी एक्सप्रेसम ध्येच घडल्या आहेत. पहाटे २.४० ते ३ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या घटनांनी महिला प्रवाशांची झोप उडाली आहे. दोनच दिवसापूर्वी सीएसएमटी-मडगाव एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या २ महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र व सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावत पुन्हा यंत्रणांना चकवा देण्याचा प्रयत्न केला आहे. तुतारी एक्प्रेसमध्ये सर्रासपणे घडणाऱ्या चोऱ्यांच्या घटनांनी तपास यंत्रणा सतर्क झाल्याची शक्यता गृहित धरत लक्ष विचलित करण्यासाठीच सीएसएम टी-मडगाव एक्स्प्रेसला ‘टार्गेट’ करत महिलांच्या गळ्यातील दागिन्यांवर डल्ला मारला.

RELATED ARTICLES

Most Popular