मुंबईहून मडगावच्या दिशेने जाणाऱ्या तुतारी एक्सप्रेसचे इंजिन फेल झाल्याने ही एक्सप्रेस कणकवलीत थांबण्याची वेळ कोकण रेल्वे प्रशासनावर आली. तुतारी एक्सप्रेस बराच वेळ कणकवली स्थानकात थांबल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. तुतारी एक्सप्रेस कणकवली स्थानकात सकाळी ११.४० वाजता कणकवलीत दाखल झाली होती. मडगाव येथून इंजिन दाखल झाल्यानंतर दुपारी ३ वाजता प्रवाशांना घेऊन तुतारी एक्सप्रेस मडगावच्या दिशेने रवाना झाली. कोकण रेल्वे मार्गावरून मुंबईहून मडगावच्या दिशेने जाणाऱ्या तुतारी एक्सप्रेसचे इंजिन फेल झाल्याने तुतारी एक्सप्रेस कणकवली रेल्वे स्टेशनमध्ये थांबवून ठेवण्यात आली होती.
कणकवली रेल्वे स्टेशनमध्ये काही तास तुतारी थांबवल्याने या रेल्वेतील प्रवाशांना नवीन इंजिन येण्याची वाट पाहावी लागली. दरम्यान मोटरमनने तुतारी मार्गस्थ करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र काही अंतर जाऊन पुन्हा तुतारी एक्सप्रेसचे इंजिन बंद होत असल्याने अखेर मडगावहुन नवीन इंजिन मागविण्यात आले त्यामुळे तुतारी एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. तसेचं यामुळे कोकण रेल्वेवर मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत देखील झाली होती. दरम्यान या रेल्वेमधील प्रवाशांना इंजिन फेल झाल्याने काही काळ विलंब झाल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून दिली जात होती.
अखेर दुपारी तीन वाजता मडगाव येथून इंजिन कणकवली येथे आल्यानंतर तुतारी एक्सप्रेस कणकवलीतून मडगावच्या दिशेने रवाना करण्यात आली. कणकवली आज सकाळपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. त्यामुळे सकाळी ११. ४० वाजता कणकवली रेल्वे स्थानकावर दाखल झालेली तुतारी एक्सप्रेस दुपारी तीन वाजता कणकवलीतून रवाना होईपर्यंत प्रवाशांची काही प्रमाणात गैरसोय झाली होती.