23.9 C
Ratnagiri
Monday, February 16, 2026

संगमेश्वर तालुक्यात जंगलतोड कोसुंबमध्ये लाकडाचा साठा

गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात विनापरवाना जंगलतोड...

काजिर्डा घाटरस्ता, सर्वेक्षणाला चालना एक कोटीची तरतूद

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह घाटमाथ्यावरील कोल्हापूर जिल्हा...

कोकण कन्या पाठोपाठ मांडवी एक्सप्रेसही खोळंबल्याने दादर स्थानकावर प्रवाशांचा संताप

मुंबईच्या दिशेने येणारी 'कोकण कन्या एक्सप्रेस' मार्गात...
HomeChiplunटिडब्लूजेचा सर्वेसर्वा समीर नार्वेकर, पत्नी, संचालक अमित पालम यांना अखेर अटक

टिडब्लूजेचा सर्वेसर्वा समीर नार्वेकर, पत्नी, संचालक अमित पालम यांना अखेर अटक

या कंपनीत मोठ्या प्रमाणात गुणवणूक ग्राहकांनी केली.

मोठ्या कमिशनचे आमिष दाखवत आणि मुबलक परतवा देत राजकारणी पोलीस प्रशासकीय अधिकारी कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिकांना हजारो कोटी रुपयांना चुना लावणाऱ्या टिडब्लूजेचा सर्वेसर्वा आणि व्यवस्थापकीय संचालक समीर नार्वेकर आणि त्याची पत्नी स्नेहा नार्वेकर संचालक अमित पालम यांना अखेर अटक करण्यात आली आहे. ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटकेची कारवाई केली आहे नार्वेकर दाम्पत्याला अटक झाली असली तरी भरलेली मूळ रक्कम मिळेल काय? हाच प्रश्न आणि धास्ती गुंतवणूकदार याना लागली आहे नार्वेकर टिडब्लूजे नावाने दाम्पत्याने सुरू केलेली ही कंपनी आहे. या मध्ये पैसे गुंतवल्यानंतर मोठा परतावा आणि कमिशन देण्याचे आश्वासन दिल्याने या कंपनीत मोठ्या प्रमाणात गुणवणूक ग्राहकांनी केली.

कंपनीने विविध योजना आणून गुंतवणूकदार याना भुरळ घातली आणि यामध्ये सारे अडकले गेले मोठा परतावा मिळत असल्याने ग्राहकांनी एकच गर्दी केली होती. टिडब्लूजे कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना सुरवातीच्या काळात वेळेत कमिशन आणि परतवा देण्यात येत होता कंपनीने ग्राहकांचा विश्वास संपादन केल्या नंतर हळू हळू रंग दाखवण्यास सुरवात केलो परतावा आणि कमिशन देण्यास उशिरा केला जाऊ लागला. सातत्याने परतावा मागणाऱ्यांना किरकोळ रक्कम वर भागवले जात होते आणि पुढील तारखेला पैसे देण्याचे आश्वासन दिले जात होते. ग्राहकांचा प्रचंड विश्वास संपादन करणाऱ्या या कंपनीने नंतर नंतर तर पैसे देणे बंदच केले.

गुन्हा दाखल मात्र अटक नाही – मोठ्या प्रमाणात परतवा मिळत असल्याने या मोहात सर्वसामान्य नागरिक उधोजक, सरकारी अधिकारी कर्मचारी आणि विशेष म्हणजे मोठ्या संख्येने पोलीसनी या मध्ये पैसे गुंतवून ठेवले होते. पोलीस अधीकारी आणि पोलिसांच्या पंतवूणुकीनंतर कंपनीत पैसे विश्वासाने गुंतवले जात होते मात्र ह्याच विश्वासाने घात केला आणि कोट्यवधी रुपये यामध्ये अडकले गेले आहेत. टिडब्लूजेच्या संचालक याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला मात्र यातील मुख्य असणारे नार्वेकर दाम्पत्य संकेत घाग याना अटक झाली नव्हती. ग्राहकानी या संदर्भात जोरदार उठाव केला होता. अनेक वेळा आंदोलनाचा इशारा ही ग्राहकांनी दिला होता. त्या नंतर संकेत घाग याला पोलिसांनी अटक केल्या नंतर आता या तिघांना पोलिसानी अटक केली आहे. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर नार्वेकर दांपत्याला तात्काळ अटक झाली नव्हती.

अखेर अटकेची कारवाई – टिडब्लूजे मास्टरमाईंड समीर नार्वे कर आणि त्याच्या पत्नीला अखेर अटक झाली आहे. राज्याबाहेर पलायन केलेल्या या दाम्पत्याला ठाणे शाखेच्या तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे ताब्यात घेत अटक केली असून याच्याकडून घोट्याळ्याची नेमकी रक्कम किती आहे आणि आर्थिक व्यवहाराचे तपशील लवकरच बाहेर येण्याची शक्यता आहे. टिडब्लूजेने जमवलेला पैसा कुठे गुंतवला आहे का? कंपनीने कुठे कुठे मालमत्ता खरेदी केल्या आहेत का असा सारा तपशील येणे महत्वाचे असून गुंतवणूकदारांची मूळ रक्कम तरी मिळेल का? हे ही आता महत्वाचे ठरले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular