28.6 C
Ratnagiri
Friday, August 1, 2025

दिवा-चिपळूण मेमू’च्या जादा दोन फेऱ्या – कोकण रेल्वे

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्यरेल्वेने अतिरिक्त गणपती...

वाटद एमआयडीसीची वाटचाल समर्थनाच्या दिशेने

रत्नागिरी तालुक्यातील वाटद येथे एमआयडीसी प्रस्तावित करण्यात...

वाशिष्ठी नदीत उडी मारणाऱ्या नवदाम्पत्याचा शोध सुरूच

वाशिष्ठी नदीत उडी घेतलेल्या नवविवाहित दाम्पत्याचा गुरूवारी...
HomeSindhudurgआंगणेवाडी जत्रेसाठी दोन विशेष रेल्वे…

आंगणेवाडी जत्रेसाठी दोन विशेष रेल्वे…

या गाड्यांचे आरक्षण रविवारी (ता. ९) खुले होणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध आंगणेवाडी भराडीदेवीची जत्रा २२ फेब्रुवारीला आहे. या जत्रेच्या पार्श्वभूमीवर नियमित रेल्वेगाड्यांना प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्यरेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस-सावंतवाडी विशेष गाड्यांच्या दोन फेऱ्या जाहीर केल्या. या गाड्यांचे आरक्षण रविवारी (ता. ९) खुले होणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस सावंतवाडी विशेष गाडी २१ ला रात्री १२ वाजून ५५ मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी १२ वाजता सावंतवाडी येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात सावंतवाडी येथून सायंकाळी ६ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ६.१० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

१९ एलएचबी डब्यांची स्पेशल ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांवर थांबेल. लोकमान्य टर्मिनस टिळक-सावंतवाडी रेल्वे २२ ला मध्यरात्री १२.५५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटून त्याच दिवशी दुपारी १२ वाजता सावंतवाडी येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात सायंकाळी ६.१० वाजता सावंतवाडी येथून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ६.१० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस पोहोचेल. २२ एलएचबी डब्यांची गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकांवर थांबणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular