केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी नुकत्याच रत्नागिरी जिल्ह्यातील रिफायनरी प्रकल्प कोकणातून विदर्भात हलवा, केलेल्या विधानावरून अनेक तर्क वितर्कांना उत आला आहे. ऍड. विलास पाटणे यांनी यावर आपले मत मांडले आहे कि, कोकणातील लोकप्रतिनिधींनी आता तरी रिफायनरीबाबत स्पष्ट भूमिका करावी. अन्यथा उद्या उशीर झालेला असेल, असे मत व्यक्त केले.
रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प अनिश्चित काळासाठी प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत हा प्रकल्प विदर्भात हलवणे योग्य होईल, अशी भूमिका नितीन गडकरी यांनी घेतली आहे. त्याला विदर्भ आर्थिक विकास मंडळाचे प्रदीप महेश्वरी यांनी पाठिंबा दिला आहे. या विषयी गडकरी यांनी १२ मार्चला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, केंद्रीय पेट्रालियम मंत्री हरदीप कौर यांना पत्र लिहिल आहे.
या पार्श्वभूमीवर ३ लाख कोटी गुंतवणुकीचा, थेट रोजगार १५ हजार, बांधकाम काळात ४०/५० हजार, संलग्न व्यवसायात एक लाख रोजगार मिळणार आहे. या रिफायनरी प्रकल्पातून विमानतळ, सुसज्ज बंदर, अद्ययावत हॉस्पिटल, आधुनिक शिक्षण, ट्रान्सपोर्ट संधी, हजारो निवासी सदनिका, हॉटेलसारख्या पायाभूत सोयी उपलब्ध होतील, असे ऍड. पाटणे म्हणाले.
यावर अखेर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रिफायनरी विदर्भात नेण्याच्या वक्तव्यावर ना. सामंत यांनी उत्तर दिले. नाणार रिफायनरीला स्थानिकांचा खूपच विरोध होता. त्यामुळे शिवसेना नाणारवासीयांच्या सोबत विरोधी भूमिकेत राहिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्या ठिकाणी रिफायनरी होणार नाही, असे आश्वासन दिले होते आणि झालेही तसेच. मात्र आता नाणार सोडून अन्य गावातील ग्रामस्थ रिफायनरीची मागणी करीत असतील व त्यामुळे येथील बेरोजगारीचा प्रश्न सुटणार असेल तर शिवसेना ग्रामस्थांसोबत असेल. रिफायनरीसाठी शिवसेना सकारात्मक आहे, असे प्रतिपादन शिवसेना नेते व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेत केले. पुढे बोलताना ते म्हणाले, कोकणातील बेरोजगारी मिटणार असेल, नागरिकांच्या समस्या सुटणार असतील तर रिफायनरीबाबत शिवसेना अजूनही सकारात्मकच आहे.