26.1 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeMaharashtraमुंबई विद्यापीठातील अमूल्य ग्रंथसंपदेचे जतन करण्याचे निर्देश – नाम. सामंत

मुंबई विद्यापीठातील अमूल्य ग्रंथसंपदेचे जतन करण्याचे निर्देश – नाम. सामंत

पुस्तकांच्या झालेल्या दयनीय अवस्थेबाबत युवासेनेने वाचा फोडल्यानंतर उदय सामंत यांनी या मोडकळीस आलेल्या ग्रंथालयाची प्रत्यक्ष पाहणी केली.

मुंबई विद्यापीठ लायब्ररीची गेल्या अनेक वर्षापासून झालेली अवस्था सर्व सोशल माध्यमातून वेगाने फिरत आहे. त्यामुळे याचीच त्वरेने दाखल घेऊन वाचनसंस्कृती आणि वाचनालय जपणे हे आवश्यकच असल्याचे नाम. उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. अनेक वर्षे हि लायब्ररी दुर्लक्षित राहिल्याने ज्ञान संपदेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक वाचकप्रेमी या वृत्ताने अतिशय हळहळ वक्त केली आहे.

अनेक वर्ष दुर्लक्ष झाल्याने अनेक पुस्तकांना वाळवी लागली आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे धूळ खात पडलेल्या मुंबई विद्यापिठातील अमूल्य ग्रंथसंपदेचे जतन केले जाणार आहे. विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील जवाहरलाल नेहरू ग्रंथालयाच्या बाजूलाच असलेल्या नवीन इमारतीत तातडीने स्थलांतर करण्याचे आदेश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी बुधवारी दिले.

निव्वळ विद्यापीठाच्या हलगर्जीपणामुळे ग्रंथालयातील लाखो पुस्तकांच्या झालेल्या दयनीय अवस्थेबाबत युवासेनेने वाचा फोडल्यानंतर उदय सामंत यांनी या मोडकळीस आलेल्या ग्रंथालयाची प्रत्यक्ष पाहणी केली. येथील परिस्थिती पाहून सामंत यांनी तीव्र संताप व्यक्त केला. येत्या २ मार्चपर्यंत या ग्रंथालयाचे स्थलांतर तसेच पुस्तकांच्या डागडुजी विषयी कार्यवाही करण्याचे आदेश उदय सामंत यांनी विद्यापीठ प्रशासनाला दिले आहेत.

बाजूलाच असणाऱ्या जवाहरलाल नेहरू ग्रंथालयाच्या नव्या इमारतीच्या मुहूर्ताचा नारळ अद्याप फुलटेला नाही. त्यामुळे जुन्या इमारतीत लाखो अमूल्य पुस्तके,  संदर्भ ग्रंथ, वर्तमानपत्रे धूळ खात पडून आहेत. यातील असंख्य पुस्तके लक्ष न दिल्याने वाळवी लागून खराब झाली आहेत. युवासेना सिनेट सदस्य अॅड. वैभव थोरात यांनी या प्रकरणी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांना निवेदन देऊन खराब होणाऱ्या या पुस्तकांना नवजीवन देण्याची मागणी केली होती.

RELATED ARTICLES

Most Popular