28.2 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeMaharashtraखास.शरद पवारांनी नाम.उदय सामंतांच्या कामाबद्दल काढले जाहीर गौरवोद्गार

खास.शरद पवारांनी नाम.उदय सामंतांच्या कामाबद्दल काढले जाहीर गौरवोद्गार

नाम. उदय सामंत यांच्या कारकिर्दीत उच्च शिक्षणाला चांगले दिवस येत आहेत, याचं समाधान आहे या शब्दात शरद पवारांनी जाहीर कार्यक्रमात गौरवोद्गार काढले आहेत.

कोणत्याही पक्षाचे असले तरी कायमच सर्व जुन्यांपासून ते नव्यांपर्यंत सर्वांशीच सलोख्याचे संबंध ठेवलेली व्यक्ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. योग्य व्यक्तीचे वेळीच कौतुक झालेच पाहिजे असे मानणारे, पक्षीय राजकारण बाजूला सारून, एखाद्याचे तोंडभरून कौतुक करायला सुद्धा मागे पुढे न पाहणारे हे अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणजे खास. शरद पवार. आपल्या निर्भीड वक्तव्याबद्दल कायमच ज्ञात आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि जेष्ठ नेते शरद पवार यांनी पुणे जिल्ह्यातील अवसरी खुर्द येथील कार्यक्रमामध्ये बोलताना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री नाम. उदय सामंत यांच्या कर्तुत्वाची दखल घेऊन, त्यांचे त्या क्षेत्रातील असेलेले अगाध ज्ञान, अद्यायवत वैचारिक दृष्टी, राज्यातील विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी, त्यांचा शैक्षणिक दर्जा उंचविण्यासाठी सुरु असलेल्या कसोसीच्या प्रयत्नांबद्दल पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. त्याचप्रमाणे नाम. उदय सामंत यांच्या कारकिर्दीत उच्च शिक्षणाला चांगले दिवस येत आहेत, याचं समाधान आहे या शब्दात शरद पवारांनी जाहीर कार्यक्रमात गौरवोद्गार काढले आहेत.

सदर कार्यक्रमाला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, शिवसेना नेते संजय राऊत, गृहमंत्री दिलीप वळसेपाटील, पणन मंत्री बाळासाहेब यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आज जरी नाम. उदय सामंत हे वेगळ्या पक्षात असले तरी, सामंतानी आपल्या राजकीय वाटचालीची सुरुवात जेष्ठ नेते शरद पवार यांच्याच मार्गदर्शनाखाली केली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील या कुल माइंड, पॉवरफुल आणि गेम चेंजिंग नेता खास. शरद पवार यांनी आज या जाहीर कार्यक्रमात नाम. सामंतांच्या केलेल्या कौतुकाबद्दल, दिलेली कौतुकाच्या थाप नक्कीच खूप मोठी असल्याचे बोलले जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular