डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठच्या, बाटू नागपूर येशील उपकेंद्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना नाम. उदय सामंत म्हणाले कि, काही माजी कुलगुरू निवृत्त झाल्यावर आरोप करतात की, उदय सामंत विद्यापीठाच्या कामामध्ये हस्तक्षेप करतात. मात्र, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग हवा असेल, यांच्या स्वतःच्या वेतनाची किंवा कुलसचिवांची थकबाकी असेल तर मंत्र्याची मदत हवी. मात्र चांगल्या गोष्टीसाठी आम्ही सूचना दिल्या तर लगेच हस्तक्षेपाचा आरोप होतो, असं म्हणत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी उघडपणे कुलगुरुंसमोरच आपली नाराजागी व्यक्त केली आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले कि, मंत्री असून सुद्धा आजपर्यंत कधी शिवसेनेच्या एखाद्या मुलाला प्रवेश द्या किंवा नोकरी द्या म्हणून कोणासाठी शब्द टाकायला संपर्क केला असेल तर सांगा, आताच पदाचा राजीनामा देतो. वशिल्यासाठी मी कधीही कोणाला फोन करत नाही, प्रत्येक जण त्याच्या कर्तुत्वाने मोठा होतो.
छत्रपतीच्या राज्यात दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून आपण कायम चांगल्या गोष्टीसाठी हस्तक्षेप करणार असल्याचे सांगत उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी माजी कुलगुरूंना चांगलीच समज दिली. पुणे विद्यपीठात अनेक वर्षांपासून पडून असलेली छायाचित्रे लावायच्या सूचना केल्या किंवा रानडे इन्स्टिट्यूटची जागा वाचवण्यासाठी प्रयत्न केला असेल तर हा शिक्षण मंत्र्याचा हस्तक्षेप ठरतो का? असा थेट सवाल सामंत यांनी यावेळी केला. विद्यापीठाच्या अनेक प्राधिकरणामध्ये होणाऱ्या कुठल्याही निर्णयात मी दखल दिली नाही, मला त्या समित्यांवर असणाऱ्यांची नावेही माहिती नाही, असे असतानाही हस्तक्षेपचा आरोप असेल तर तो पूर्णपणे खोटा आहे.