28.6 C
Ratnagiri
Friday, May 17, 2024

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गोविंदाने स्टेजवर केला डान्स

2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी गोविंदा पुन्हा राजकारणात...

मतदान प्रक्रियेसाठी एसटी बसेस आरक्षित झाल्याने प्रवाशांचे नियोजन फिस्कटले…

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील येथील एसटी आगाराच्या...

उपासमारीची वेळ पाणलोट सचिवांचा आंदोलन छेडण्याचा इशारा…

प्रधानमंत्री कृषी सिंचन पाणलोट विकास योजनेअंतर्गत गेल्या...
HomeDapoliपरबांच्या घरासह एकाच वेळी ७ ठिकाणी ईडीचा छापा, तब्बल साडेतेरा तास चौकशी

परबांच्या घरासह एकाच वेळी ७ ठिकाणी ईडीचा छापा, तब्बल साडेतेरा तास चौकशी

परब म्हणाले, दापोली येथील साई रिसॉर्ट हे त्यांच्या मालकीचे नसून ते रिसॉर्ट बंद असून देखील ईडीने त्यांच्यावर कारवाई केली आहे.

शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री, रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्या भोवती सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने कारवाई केली आहे. गुरुवारी परब यांचे सरकारी निवासस्थान आणि वांद्रे येथील राहत्या घरासह संबंधित तब्बल ७ ठिकाणी एकाच वेळी छापा टाकण्यात आल्याने शिवसेना हादरली. मुंबईसह पुणे व कोकणातील मालमत्तेचा या छाप्यामध्ये समावेश आहे.

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दापोली येथील साई रिसोर्ट संबंधी केलेली तक्रार आणि केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या कारवाईनंतर मुरूड येथील समुद्र किनारी असलेले साई रिसॉर्ट चर्चेत आले. दापोली येथील रिसॉर्टमध्येही ईडी पथक दाखल झाले असून, या रिसॉर्टमध्ये रात्री उशिरापर्यंत ईडीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु होती.

बंद असलेल्या साई रिसॉर्टचे सांडपाणी समुद्रात जाते यावरून ईडीने चौकशी केली, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी ईडीने त्यांच्या घरी आणि शासकीय निवासस्थानी छापेमारी केल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.  ईडीच्या पथकाने तब्बल साडेतेरा तास अनिल परबांची चौकशी केल्यानंतर त्यांच्या घरातून बाहेर पडली. यानंतर अनिल परबांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी परब म्हणाले, दापोली येथील साई रिसॉर्ट हे त्यांच्या मालकीचे नसून ते रिसॉर्ट बंद असून देखील ईडीने त्यांच्यावर कारवाई केली आहे. सांडपाणी आणि मनी लॉड्रिंगचा काय संबंध असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला होता. आणि ईडीने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले असून यापुढे देखील त्यांना विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईल, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. ईडीने २६ मे सकाळी अनिल परबांच्या यांच्या वांद्रे येथील खासगी आणि मरिन ड्राईव्ह शासकीय निवासस्थानी ‘अजिंक्यतारा’ येथे छापे मारले आहे. शिवसेनेला त्यामुळे मोठा धक्का बसल्याचे समोर आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular