26 C
Ratnagiri
Saturday, November 22, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeChiplunनदीतील गाळ काढल्याशिवाय,कोणतीच पूररेषा निश्चित केली जाणार नाही – नाम. उदय सामंत

नदीतील गाळ काढल्याशिवाय,कोणतीच पूररेषा निश्चित केली जाणार नाही – नाम. उदय सामंत

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात जुलै महिन्यात ओढवलेली महापुराची स्थिती पुन्हा ओढवू नये यासाठी, चिपळूण येथील नागरिकांनी सहा डिसेंबर पासून चिपळूणमधील पूरस्थिती बाबत साखळी उपोषण सुरू केले आहे. त्या उपोषणकर्त्या नागरिकांना आज उदय सामंत यांनी भेट दिली यावेळी स्थानिक आमदार शेखर निकम हे त्यांच्या सोबत होते. वारंवार पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कायमस्वरूपी आराखडा तयार करण्याची गरज आहे, तो आराखडा केला जाईल तत्पूर्वी नदीतील गाळ काढल्याखेरीज पूररेषा निश्चित केली जाणार नाही असे आश्वासन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज चिपळूण येथे दिले.

याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, गाळ काढण्याचे काम तात्काळ सुरू करण्यात आले आहे तथापि या कामासाठी जो काही निधी लागणार आहे, तो निधी शासन उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध आहे. वाशिष्टी नदीचा गाळ काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साडे सात कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याचप्रमाणे नागरिकांनी उपोषणामध्ये राजकारण न करता, पक्षविरहित आंदोलन उभे केल्याने याची दखल शासनाने घेतली आहे व शासनातील एक मंत्री या नात्याने मी निश्चितपणे चिपळूणकरांची भूमिका मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे तसेच जलसंपदा मंत्री श्री. जयंत पाटील यांच्याकडे मांडणार आहे आणि चिपळूणकरांना न्याय मिळवून देण्यात माझी भूमिका पार पाडणार आहे.

प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांना याबाबत स्पष्ट सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात त्या अनुषंगाने काम सुरू करण्यात येईल यासाठी तातडीची बाब म्हणून साडे सात कोटी रुपये देखील मंजूर करण्यात आले आहे उर्वरित निधी देण्यास आराखडा तयार झाल्यावर, प्रस्ताव आल्यानंतर मान्यता देण्यात येईल असे नाम. सामंत यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular