27.7 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeMaharashtraसंजय राऊत यांना त्यांचा श्वास कसा थांबवायचा हे मी दाखवून देईन –...

संजय राऊत यांना त्यांचा श्वास कसा थांबवायचा हे मी दाखवून देईन – उदयनराजे भोसले

"कोणत्याही कुटुंबातील असला तरी त्याला स्वाभिमान असतो, स्वाभिमान छेडला तर बाकिचे एकवेळ गप्प बसतील; मात्र, मी गप्प बसणार नाही.

सध्या सगळीकडे निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्यामुळे विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत सुटले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी कोल्हापूर येथील कार्यक्रम संपल्यानंतर संजय राऊत यांनी छत्रपती घराण्याबाबत सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या पोस्टवर त्यावेळी उदयनराजे भोसले यांनी कोणतीच प्रतिक्रीया दिली नव्हती. मात्र, आज साताऱ्यात महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याला बक्षीस देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पत्रकारांनी त्यांना राउत यांच्या बद्दल छेडले असता, त्यांनी संजय राऊत यांच्यावर चांगलीच आगपाखड केली आहे.

ते बोलताना म्हणाले, कोण संजय राऊत हे मला माहित नाही. कोणाबद्दल आम्ही वाईट बोलत नाही. परंतु, आमच्याबद्दल कोणी वाईट बोललं तर आम्ही बांगड्या घातल्या नाहीत. त्यांचा श्वास कसा थांबवायचा हे मी दाखवून देईन, असा इशारा उदयनराजे भोसले यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना दिलाय.

स्वाभिमानाला छेडचाल कराल तर मी गप्प बसणार नाही, त्यांना बघायला वेळ लागणार नाही, असा इशारा उदयनराजे भोसले यांनी यावेळी दिला. “संजय राऊत यांना त्यांचा श्वास कसा थांबवायचा हे मी दाखवून देईन.

“कोणत्याही कुटुंबातील असला तरी त्याला स्वाभिमान असतो, स्वाभिमान छेडला तर बाकिचे एकवेळ गप्प बसतील; मात्र, मी गप्प बसणार नाही. पुढची भूमिका बोलून दाखवत नाही. लोक बघतील काय करायचे ते, किती वेळ लागतो, असे खूप बघितले आहेत. आम्ही सर्वांचा मान सन्मान करतो, त्यांना कोणी अधिकार दिला आमचा अपमान करायचा? असा प्रश्न उदयराजे भोसले यांनी यावेळी उपस्थित केला.

RELATED ARTICLES

Most Popular