24.8 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeMaharashtraदसरा मेळाव्यामध्ये शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे रोखठोक

दसरा मेळाव्यामध्ये शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे रोखठोक

कुणाच्या कुटुंबावर वैयक्तिक, पत्नीवर, मुलांवर खोटे आरोप करणे हे हिंदुत्व नाही. याला नामर्द किंबहुना अक्करमाशीपणा असे म्हणतात, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी माटुंगा येथील षण्मुखानंद हॉलमध्ये शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. सुरुवातीपासूनच पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षावर जोरदार हल्ला चढवला. या सोहळ्याला शिवसेनेचे मंत्री, पदाधिकारी, आमदार, खासदार  व शिवसैनिक उपस्थित होते.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणावर आणि काय तोफ डागणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. अनेकानी उद्धव ठाकरेंच्या रडारवर भाजप पक्ष आणि नेते असणार असे गृहीत धरले होते. उद्धव ठाकरे यांनीही भाषणाच्या सुरुवातीलाच थेट भाजपवर हल्ला चढवत त्यांची बिनपाण्याची तासायला सुरु केली. अगदी पहिल्या वाक्यापासून उद्धव ठाकरेंनी भाजपला सळो कि पळो करून सोडले.

पुढे बोलताना ते उपस्थित शिवसैनिक आणि पदाधिकार्यांना म्हणाले कि, तुमचे आशीर्वाद घेत असताना माझ्या मनात नेहमीच नम्र भावना असते. त्याचप्रमाणे, प्रत्येक जन्मी हेच आई-वडील,  माझा कुटुंब-परिवार हाच मिळाला पाहिजे. आणि पुढील जन्म देखील महाराष्ट्रामध्येच व्हायला पाहिजे. मला स्वत:ला मी मुख्यमंत्री आहे,  असं कधीच वाटू नये. माझं तर सोडाच तर माझ्या मायबाप जनतेला सुद्धा मी मुख्यमंत्री आहे असं कधीच वाटता कामा नये. मी त्यांच्या घरातीलच एक आहे,  मी तुमचा भाऊ आहे, असं वाटावे,  अशी ईश्वर चरणी प्रार्थना आहे.

छापा काटा खेळ असतो तसा छापा टाकून काटा  काढण्याचा प्रकार सुरू आहे. ही थेरे फार काळ चालत नाहीत. कुणाच्या कुटुंबावर वैयक्तिक, पत्नीवर, मुलांवर खोटे आरोप करणे हे हिंदुत्व नाही. याला नामर्द किंबहुना अक्करमाशीपणा असे म्हणतात, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. राज्यामध्ये तपास यंत्रणांकडून टाकण्यात येत असलेल्या छाप्यांबाद्द्ल उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला.

RELATED ARTICLES

Most Popular