22.1 C
Ratnagiri
Wednesday, December 3, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeMaharashtraउद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश

उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या ५० जिल्हाप्रमुखाना आज मार्गदर्शन केल्याची बातमी शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी दिली. केंद्रामध्ये कॅबिनेट विस्तार झाल्यानंतर राज्यातही विविध पक्षांच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना पक्षाला बळकटी येण्यासाठी कामाला लागा, युती किंवा आघाडीची अजिबात चिंता न करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून शिवसेनेच्या सर्व जिल्हाप्रमुखांची आज बैठक पार पडली. खासदार अनिल देसाई या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर खासदार अनिल देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले की,  कोरोनामुक्तीसाठी प्रत्येक गावात काम करा. माझं गाव कोरोनामुक्त गाव अशी मोहिम राबवा. गावागावांत शिवसंपर्क अभियान सुरू करा. जनतेची काम करा. पक्ष बळकट करा. येत्या वर्षभरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना ताकदीने सामोरे जाण्यासाठी सेनेने १२ जुलै ते २४ जुलैपर्यंत शिवसंपर्क मोहीम हाती घेतल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सांगितले.

महाविकास आघाडी सरकारमधील कॉंग्रेस आणि रा. कॉंग्रेस पक्ष विस्तारासाठी आणि मजबुती टिकविण्यासाठी सत्तेचा वापर जाणीवपूर्वक करतात. पण शिवसेना आणि जनता यांच्यातील महत्वाचा दुवा हा शाखाप्रमुख असतो. गावोगावच्या शाखांमधूनच शिवसेना विस्तारत गेली आहे. येत्या काळामध्ये शाखाप्रमुखांवर पक्ष बांधणीची मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये अनेक लहान मोठी पदे देखील निर्माण झाली असून पण तरीही ठाकरे यांनी सर्व जबाबदारी आणि विश्वास शाखा प्रमुखांवर दाखवला आहे. त्यामुळे येत्या काळात विधानसभा निहाय, तालुका निहाय, पंचायत निहाय जोरदार  पूर्वतयारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular