युक्रेनची राजधानी कीव्ह शहरातील रस्त्यावर आता रशियन आणि युक्रेनियन सैनिकांमध्ये जोरदार लढाई सुरु आहे. याच दरम्यान, युक्रेनने शरणागती पत्करली अथवा पलायन केल्याच्या अफवा पसरू लागल्या परंतु, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी सेल्फी स्टाइलमधील एक व्हिडिओ शूट करून तो ट्विटरवर शेअर केला आहे, आणि पलायनाचे वृत्त फेटाळून लावले असून, त्यांनी शरणागती पत्करणार नसल्याचे म्हटले आहे. “मी इथेच आहे. आम्ही शरणागती पत्करणार नाही. आम्ही देशासाठी लढू. कारण आमची शस्त्रे हेच आमचे सत्य आहे.” असे युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितले आहे.
रशियन सैन्याने युक्रेनमध्ये भयंकर विध्वंस केला असून दोन्ही बाजूंनी झालेल्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. या युद्धाच्या काळात युक्रेनने आपल्या एका सैनिकाचे कौतुक केलं आहे. रशियन रणगाड्यांना पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी या युक्रेनच्या सैनिकाने आपल्या जीवाची बाजी लावून रशियन सैन्याला पुढे शिरू न देता, तिथेच रोखले.
रशियन सैन्य हेनिचेस्क पुलाच्या दिशेने जात होते. या पुलावर हा शिपाई तैनात होता. जेव्हा या सैनिकाला रशियन सैन्याला रोखण्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता तेव्हा त्याने हा पूल स्वतःच उडवण्याचा निर्णय घेतला. पण वेळ फारच कमी होता. हे पाहून, सैनिक विटाली स्काकुन वोलोडीमायरोव्हिचने बॉम्ब स्वत: ला बांधून उडवले आणि पूल नष्ट केला. त्यामुळे हेनिचेस्क ब्रिजवरून जाण्याचे रशियन सैन्य पुढे न यायला मिळाल्याने तिथूनच गेले.
राष्ट्राध्यक्ष त्यांनी झेलेन्स्की यांनी म्हटले आहे कि, आमच्या देशातील सर्व नागरिक देशाच्या संरक्षणासाठी हातात शस्त्रे घेऊन उभे आहेत. त्यामुळे मित्र राष्ट्रांकडून शस्त्रांची मदत असून युद्धविरोधी भूमिका कायम असल्याचे त्यांनी म्हटले आहे.