22.7 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriरत्नागिरी युनियन बँक ऑफ इंडीया शाखेमध्ये कोटींचा अपहार

रत्नागिरी युनियन बँक ऑफ इंडीया शाखेमध्ये कोटींचा अपहार

कर्जदार, शाखा व्यवस्थापक, मध्यस्थांसह २३ जणांवर रत्नागिरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रत्नागिरी युनियन बँक ऑफ इंडीयाच्या शाखा व्यवस्थापकाला हाताशी धरून खोटी कागदपत्रे सादर करून ५ कोटी १२ लाख ९८ हजार रुपयांना फसवणाऱ्या कर्जदार, शाखा व्यवस्थापक, मध्यस्थांसह २३ जणांवर रत्नागिरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील फिर्यादी विरेश चंद्रशेखर यांना युनियन बँकेकडुन झाल्या आदेशा प्रमाणे सन २०१५-२०१६ या सालात वीस कर्जदार यांनी अर्ज घेण्यासाठी सादर केलेली संबधित कागदपत्रे ज्यामध्ये ७/१२ उतारा व अन्य कागदपत्रे तसेच खोटे व बनावट भाडे करारपत्र / वट मुखत्यारपत्र, कर्ज मागणी, अर्ज व त्या संबंधित कागदपत्रे तसेच कर्ज मंजूर केलेल्या संदर्भातील सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रती असलेल्या एकुण २० कर्जदार यांनी तसेच सदर कर्ज मंजुरी करीता मध्यस्ती म्हणुन राजेश शंकर सनगरे , रा भाटीमिया व समीर कमलाकर शिवलकर, रा. मांडवी यांनी आपापसात संगनमत करुन युनियन बँक ऑफ इंडीया या बॅकेची फसवणुक करण्याच्या उद्देशाने बँकेकडुन आंबा पिक पाणीसाठी कर्ज मंजुरी करीता संशयास्पद खोटी कागदपत्रे तयार करुन आणि ती खरी आहेत असे भासवून त्याद्वारे कर्ज मंजूर करुन घेवुन त्या मंजुर रक्कमेचा आंबा पिक पाणीकरीता वापर न करता,  वैयक्तीक खर्चासाठी वापर करुन सदर रक्कमेची परत फेड केलेली नाही. या संदर्भात शाखा व्यवस्थापक एस. प्रशांत यांची बॅकेकडुन चौकशी झाली त्यामध्ये ते दोषी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर बँकेने रीतसर तक्रार केली असता, आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विरेश चंद्रशेखर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तत्कालीन शाखाध्यक्ष एस.प्रशांत सध्या रा.कर्नाटक, राजेश शंकर सनगरे भाटीमिऱ्या, समीर कमलाकर शिवलकर रा. झाडगाव आणि इतर २० जण या सर्वांवर भा. दं. वि. क. ४०६,४०९,४२०,४६५,४६८,४७१,४७२,११९,२००,१९३,१२०(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular