१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला मिळालेल्या स्वातंत्र्याबद्दल, रत्नागिरीतील हातिस या गावी भैरी जुगाई मंदिर परिसरात १९४७ साली म्हणजेच आपल्या भारताच्या स्वातंत्र्य दिनी आनंदाने, खुशीने ग्रामस्थांनी मिळून या डौलदार कल्पवृक्षाची लागवड केली होती. आज कल्पवृक्षालादेखील ७५ वर्षे पूर्ण झाली असून आज तो दिमाखदार पणे उंच उंच झेपावत आहे.
हातीस गावचे ग्रामस्थ दरवर्षी कल्पवृक्षाचा वाढदिवस पारंपारिक पद्धतीने औक्षण करून, तर आधुनिक पद्धतीप्रमाणे केक कापून सुद्धा साजरा करतात. १९४७ साली कल्पवृक्षाची लागवड केलेल्या व्यक्ती जरी अस्तित्वात नसतील तरी, त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दरवर्षी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी या कल्पवृक्षाबद्दलची ग्रामस्थांनी माहिती दिली आहे. यंदाच्या वर्षी कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा केला जाणार नसून स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षे म्हणून ७५ रोपांचे ग्रामस्थांना वितरण करण्यात आले आहे.
रत्नागिरीतील हातीस मध्ये भैरी जुगाई मंदिराच्या परिसरामध्ये ७५ वर्षांपूर्वी वाजत गाजत देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या खुशीमध्ये ढोल-ताशाच्या मिरवणुकीमध्ये सदरच्या कल्पवृक्षाची लागवड करण्यात आली होती. आजचे स्वातंत्र्य दिनाचे वर्षे ७५ वे असून त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसेच गावच्या ग्रामस्थांनी हा वारसा पुढे चालू राहावा यासाठी अनेक वेळा मान्यवरांच्या उपस्थितीत देखील या कल्पवृक्षाच्या वाढदिवस साजरा केला आहे. अनेक गावांची अशी काही ना काही खासियत असते तसेच या हातीस गावाला या ७५ वा वर्षाच्या कल्पवृक्ष यामुळे अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. दरवर्षी आवर्जून न चुकवता या कल्पवृक्षाची पारंपारिक ओवाळणी आणि शाळेतील विद्यार्थ्यांच्या समवेत वाढदिवस साजरा केला जातो.