28.2 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeEntertainmentमाजी क्रिकेटपट्टू विनोद कांबळी यांना सायबर चोरांनी घातला लाखोंचा गंडा

माजी क्रिकेटपट्टू विनोद कांबळी यांना सायबर चोरांनी घातला लाखोंचा गंडा

इंटरनेट, स्मार्ट फोन, सोशल मीडिया हा सध्या सर्वांच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक बनला आहे. असं म्हटल तर वावग ठरणार नाही. परंतु, सोशल मीडियाचा अती प्रमाणात केला गेलेला वापर मात्र  घातक ठरू शकतो. कारण सायबर चोर सोशल मीडियाद्वारे लाखो रुपयांचा गंडा घालू शकतात. असाच काहीसा प्रकार दिग्गज भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी सोबत घडला आहे

भारताचा माजी क्रिकेटपट्टू विनोद कांबळी यांनी सायबर चोरट्याकडून लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. सायबर चोरट्यांनी विनोद कांबळीच्या खात्यातून तब्बल १ लाख १४ हजार रुपये चोरले आहेत. ३ डिसेंबर रोजी कांबळी याच्या मोबाइलवर एक निनावी फोन आला. फोनवरील व्यक्तीने आपण बँकेतून बोलत असून, तुमची बँकेची KYC अपडेट नसल्याचे सांगितलं.

जर वेळीच KYC अपडेट केले नाहीत तर व्यवहार ठप्प होण्याची भीती या चोरट्यांनी कांबळी यांना दाखवली.  त्यावर कांबळी यांनी आंधळा विश्वास ठेवल्याने कांबळी अलगद चोरट्यांच्या जाळ्यात ओढले गेले. फोन सुरु असतानाच चोरट्यांनी कांबळी यांच्या मोबाइलवर एक लिंक पाठवली. या लिंकवरील एनी डेस्क अँप डाऊनलोड करून त्यावर आलेला ओटीपी सांगण्यास सांगून कांबळी यांच्या मोबाइलाचा एक्सेस मिळवला. त्यानंतर आरोपींनी टप्याटप्याने कांबळी यांच्या खात्यातून १ लाख १४ हजार काढले.

आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कांबळी यांनी ताबडतोब वांद्रे पोलिसात धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी ७ डिसेंबर रोजी अनोळखी सायबर चोराविरोधात गुन्हा नोंदवला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी सायबर पोलिसांची मदत घेणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सर्वसामान्य, भोळी भाबडी माणसे अशा भूलथापांना बळी पडतात, पण दिग्गज खेळाडू अशा फसवणूकीला बळी पडला याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. प्रशासन, पोलीस, बँक वेळोवेळी नागरिकांना सावधान करून सायबर चोरांपासून बचाव करण्यास सांगतात. जर कोणत्याही अनोळखी नंबरवरून कॉल आला, तर नेहमी त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा. इंटरनेट बँकिंग लॉगिन आयडी आणि पासवर्ड काही महिन्यांच्या फरकाने बदलत राहिले पाहिजे. बँकाही आपल्या ग्राहकांना मेसेज आणि फोनद्वारे सायबर चोरांपासून सावध राहण्याचे सांगत असतात. व्यवहाराचा ओटीपी चुकूनही कोणाला शेअर करू नका. पण तरीही अशा घटना घडतातच.

RELATED ARTICLES

Most Popular