22.7 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeMaharashtraअवकाळी पावसाचा अंदाज डिसेंबरमध्ये चक्रीवादळाची शक्यता

अवकाळी पावसाचा अंदाज डिसेंबरमध्ये चक्रीवादळाची शक्यता

कोकणपट्टीतही अवकाळी पाऊस बरसण्याची शक्यता आहे.

राज्यातील वातावरणात चांगलाच बदल होत आहे. कुठे थंडीचा कडाका तर कुठं ढगाळ वातावरण दिसत आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच दिवस राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी उत्तर महाराष्ट्रात गारपिटीसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर डिसेंबर महिन्यात चक्रीवादळाचा धोका देखील संभवतो.

हवामान विभागाने राज्याच्या विविध भागात वादळी पावसाची शक्यता वर्तविली आहे. उत्तर महाराष्ट्रासह छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसासोबतच वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात देखील विजांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात शनिवारपासून पावसाचा जोर दिसणार आहे. कोकणपट्टीतही अवकाळी पाऊस बरसण्याची शक्यता आहे.

डिसेंबरमध्ये चक्रीवादळ? – दरम्यान, पंधरा दिवसानंतर म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात (५ ते ६ डिसेंबर) बंगालच्या उपसागरात पुन्हा एखाद्या चक्रीवादळाची शक्यता आहे. बांगलादेशकडे त्याची वाटचाल राहू शकते. त्यामुळं महाराष्ट्राला त्याचा धोका नाही. सध्या एल निनो मध्यम तीव्रतेत आहे. मध्यम का असेना पण त्याचे अस्तित्व आहे. शिवाय पावसासाठी पूरक ठरत असतो तो धन आयओडी पुढील महिन्यात डिसेंबरअखेर नामशेष होण्याच्या मार्गांवर असल्याचे माणिकराव खुळे म्हणाले. तसेच एमजेओ सध्या फेज २ मध्ये असून तो माघ्वारी फिरुन ६ मध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं डिसेंबरमधील चंपाषष्टी दरम्यान पडणाऱ्या पावसाची शक्यताही मावळली असल्याचे माणिकराव खुळे म्हणाले.

दरवर्षी जशी थंडी असते तशीच थंडी उर्वरित नोव्हेंबर महिन्यात असेल. ३० नोव्हेंबरपर्यंत १४ ते १६ डिग्री दरम्यान किमान तापमान असु शकते. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात थंडी कमी जाणवण्याची शक्यता आहे. खान्देशात थंडीचे प्रमाण अधिक असण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदल हा बंगालच्या उपसागरातून १५ डिग्री अक्षवृत्तादरम्यान पूर्वेकडून येणाऱ्या आणि तामिळनाडू केरळ राज्य ओलांडून पश्चिमकडे वाहणाऱ्या मजबूत ‘पुर्वी वारा झोता’ तून वाहणारा हिवाळी मोसमी वाऱ्यामुळं महाराष्ट्रतही जाणवेल.

RELATED ARTICLES

Most Popular