गेल्या जवळपास दीड वर्षांमध्ये कोरोना काळात अनेक अभिनेत्रींनी आपली लग्न उरकून घेतली होती आपल्या सर्वांची ची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी देखील या काळामध्ये लग्नाच्याबेडी मध्ये अडकली. सोनालीने त्याचे फोटो देखील तिच्या इंस्टाग्राम अकाउंट ला हल्लीच अपलोड केलेले आहेत. या काळात अनेक अभिनेत्रींनी आयुष्याच्या एका नव्या पर्वाची सुरुवात केली आहे.. आई बनून !
मराठी अभिनेत्री उर्मिला निंबाळकर हिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. उर्मिला हिला तीन ऑगस्ट रोजी मुलगा झाला असून इंस्टाग्राम सोशल माध्यमाद्वारे तिने आपल्या चाहत्यांना ही बातमी दिलेली आहे. तिची डिलिव्हरी c-section द्वारे अर्थात सिझेरियन पद्धतीने झाली आहे याबाबत बोलताना उर्मिला म्हणाली, अजून शंभराव्या व्यक्तीनं विचारायच्या आधीच ही पोस्ट! या पोस्टचे कारणही, मी यांचे उत्तर कोणतेही दडपण किंवा कमीपणा न घेतां देऊ शकते म्हणून, परंतु इतर स्रीयांना या इतक्या खाजगी प्रश्नाचा त्रास होऊ शकतो. कारण यांतही तीची तुलना केली जाऊन तिचे मानसिक खच्चीकरण केले जाते. माझं ‘C’ section झालं. Delivery नंतर बाळ आणि मी दोघेही अतिशय सुदृढ आणि सुखरुप आहोत.
उर्मिला निंबाळकर हे मराठी अभिनेत्री असून ती खास करून प्रसिद्ध आहे तिच्या स्पष्टवक्तेपणा बद्दल आणि तिच्या यूट्यूब चॅनल बद्दल तिचा गरोदरपणाचा पूर्ण प्रवास व्हिडिओ माध्यमातून तिने लोकांसमोर प्रसिद्ध केला आहे अगदी डोहाळे जेवण देखील तिने आपल्या प्रेक्षकांसमोर युट्युब माध्यमाद्वारे प्रसिद्ध केले होते. पूर्ण मराठी चित्रपट इंडस्ट्री मधून तिच्यावर आता अभिनंदनाचा वर्षाव होत आहे आपल्या रत्नागिरीकर टीम कडून देखील उर्मिला हिला आयुष्याच्या या नवीन प्रवासासाठी शुभेच्छा !