22.2 C
Ratnagiri
Saturday, January 24, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeRatnagiriशीळ धरणात उपयुक्त पाणीसाठा ४७.१२ टक्केच, बाष्पीभवन वाढले

शीळ धरणात उपयुक्त पाणीसाठा ४७.१२ टक्केच, बाष्पीभवन वाढले

एका आठवड्यात बाष्पीभवनामुळे सुमारे १.६६ दलघमी पाणीसाठा घटल्याची स्थिती आहे.

राज्यासह जिल्ह्यात पाणीटंचाईची भीषण स्थिती आहे. मार्चच्या पहिल्याच आठवड्यात जिल्ह्यातील ४६ लघुपाटबंधारे धरणांमध्ये १११.४० दशलक्ष घन मीटर पाणीसाठा असून, तो एकूण ४७.१२ टक्के एवढाच आहे. एका आठवड्यात बाष्पीभवनामुळे सुमारे १.६६ दलघमी पाणीसाठा घटल्याची स्थिती आहे. जिल्ह्यातील तिन्ही मध्यम पाटबंधारे प्रकल्पामध्ये समाधानकारक पाणीसाठा आहे. जिल्ह्यात ३ मध्यम धरण प्रकल्प तर ४६ लघु पाटबंधारे धरण प्रकल्प आहेत. त्यामध्ये मध्यम धरण प्रकल्पापैकी नातूवाडी धरणामध्ये आजचा उपयुक्त पाणीसाठा ४५.७५ टक्के आहे. गडनदी प्रकल्पात ६६.२२ टक्के तर अर्जुना प्रकल्पामध्ये ८७.८८ टक्के असा चांगला पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील या पाणीसाठ्याचा शेतीसाठी होणारा वापर मात्र कमी आहे. एका आठवड्यात या धरणांमधील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात घटला आहे. गेल्या आठवड्यात नातूवाडी ४९.८२ टक्के, गडनदी ६७.७० टक्के, अर्जुना धरण प्रकल्पात ८७.०७ टक्के पाणीसाठा होता. असह्य उकाड्यामुळे आठवड्यामध्ये या धरणांमधील पाणीसाठा घटला आहे. पाटबंधारे विभागाने घेतलेल्या आकडेवारीनुसार, ४६ धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा ११३.०६ दलघमी एवढा आहे. ही टक्केवारी ४७.१२ टक्के आहे. आठवड्यात सुमारे १.६६ दलघमी एवढा पाणीसाठा कमी झाला आहे. हे प्रमाण असेच राहिले तर अजून अडीच महिन्यामध्ये पाणीटंचाईच्या भिषण परिस्थितीला तोंड द्यावे लागणार असल्याचे चित्र आहे.

RELATED ARTICLES

Most Popular