27.7 C
Ratnagiri
Monday, September 1, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeRatnagiriअज्ञात सायबर चोरट्याने घातला १ लाख १८ हजाराला गंडा

अज्ञात सायबर चोरट्याने घातला १ लाख १८ हजाराला गंडा

ऑनलाईन गंडा, सायबर क्राईम, ऑनलाईन फसवणूक असे अनेक प्रकार सध्या सगळीकडेच सुरु आहेत. मोठ्या शहरांसह आता लहान शहरांमध्ये सुद्धा हे फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत. रत्नागिरीमधील एकाला सुद्धा अशाच प्रकारे फसवण्यात आले असून, पोलीस आणि बँका वारंवार अशा सायबर चोरांपासून सावध राहायला सांगत असूनसुद्धा अनेक निष्पाप जनता यामध्ये ओढले जातात.

रत्नागिरी शहरातील सिद्धिविनायक नगरमध्ये राहणार्‍या राहुल वळवी यांची एसबीआय बँकेतील अकाउंट अपडेट करण्याच्या बहाण्याने अज्ञात सायबर चोरट्याने १ लाख १८ हजाराची फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे.  घडले असे कि, राहुल वळवी यांच्या वडिलांचे एसबीआय बँकेत अकाउंट असून, ते अपडेट करण्यासाठी  फिर्यादी यांनी योनो अॅप डाऊनलोड केले. पण ते करताना काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आल्याने त्यांनी कस्टमर केअरला फोन केला. एसबीआय बँकेचे ग्राहक सेवा कार्यकारी अधिकारी बोलत असल्याचे भासवून त्या व्यक्तीने त्यांना एनी डेस्क हा अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले.

राहुल वळवी यांनी कस्टमर केअर वर मिळालेल्या सूचनांप्रमाणे अॅप डाउनलोड केले. आणि त्यानंतर यांच्या वडिलांच्या अकाऊंटमधून इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून संबंधित अज्ञात सायबर चोरट्याने १ लाख १८,३५४ रुपये एवढी मोठी रक्कम काढून घेतली.

एनी डेस्क हा अॅप वापरताना खूप खबरदारी बाळगावी लागते. अनेकदा गुगल सुद्धा याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन करत असते. परंतु, घरबसल्या काम त्वरित व्हावी यासाठी अशा अॅपचा वापर केला जातो. परंतु, काही वेळा अशा प्रकारच्या फसवणुकीचे शिकार होण्याच्या घटना घडतात. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वळवी यांनी त्वरित शहर पोलीस स्थानकात अज्ञात सायबर चोरट्याच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली.

RELATED ARTICLES

Most Popular