28.1 C
Ratnagiri
Friday, September 20, 2024

खेडच्या भोस्ते घाटात मृतदेह, तो स्वप्नात येऊन सांगतोय की मदत करा !

रत्नागिरीतील खेड तालुक्यातील भोस्ते घाटात एका पुरुषाचा...

Redmi Note 14 मालिका 50MP OIS कॅमेऱ्यासह लॉन्च केला जाईल…

कंपनीने अधिकृतपणे Redmi Note 14 सीरीजचा खुलासा...
HomeMaharashtraउपमुख्यमंत्र्यांच्या नावे खंडणी प्रकरण उघडकीस, ६ अटकेत

उपमुख्यमंत्र्यांच्या नावे खंडणी प्रकरण उघडकीस, ६ अटकेत

इथे तर चक्क उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नंबरचा वापर करून खंडणीसाठी एका बिल्डरला धमकावण्यात आले आहे.

देशात अनेक प्रकारचे गुन्हे घडत असतात. आणि पोलीस त्याचा योग्य प्रकारे छडा लावत असतात. अनेकदा बँक फेक कॉल द्वारे फसवणूक केली जाते. इथे तर चक्क उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नंबरचा वापर करून खंडणीसाठी एका बिल्डरला धमकावण्यात आले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाइल क्रमांकाचा वापर करून फेक कॉल अॅपद्वारे पुणे येथील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाकडे २० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी खंडणी घेण्यासाठी सहा जण आले असता त्यांना अटक करण्यात आली आहे.

मागील दहा दिवसांपासून हा खंडणी मागण्याचा प्रकार १३ जानेवारीपर्यंत सुरूच होता. आरोपी उपमुख्यमंत्री यांचा पीए चौबे बोलतोय म्हणून बिल्डर सोबत संपर्कत होते. याबाबत तक्रारदार बांधकाम व्यावसायिकाने बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्याप्रसंगी पोलिसांनी नवनाथ भाऊसाहेब चोरमले रा. हवेली, सौरभ नारायण काकडे रा. हडपसर, सुनील उर्फ बाळा गौतम वाघमारे,  किरण रामभाऊ काकडे, चैतन्य राजेंद्र वाघमारे आणि आकाश शरद निकाळजे सर्व रा. भेकराईनगर, फुरसुंगी ही अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

घडलेली घटना या प्रकारे आहे. पुणे शहरातील एका मोठ्या बांधकाम व्यवसायिकाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पीए बोलत असल्याचं बनावट फोन आला. फेक ॲपद्वारे अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकाचा गैरवापर करुन आरोपींनी त्यावरुन बांधकाम व्यवसायिकाला फेक फोन केल्याची माहिती समोर आली आहे.

बिल्डरकडे २० लाख रुपयांची खंडणी प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात आयपीसी कलम ३८४, ३८६, ५०६, ३४ आयटी ॲक्ट कलम ६६ (सी), (डी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. २० लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी पोलिसांनी ६ जणांना अटक केल आहे. पुढील तपास पोलिसांमार्फत सुरु ठेवण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular