27.7 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

शेती संरक्षणासाठी हवे विमा कवच – कृषी विभाग

नैसर्गिक आपत्ती, कीड वा रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये...

गडनरळ ग्रामस्थ ‘वाटद’बाबत सकारात्मक

वाटद एमआयडीसी जमीन भूसंपादनाबाबत आज वैयक्तिक हरकतींवरील...

रत्नागिरीनजीक मिऱ्या येतील उधाणात वाहून जाणाऱ्यास जीवदान

शहराजवळील मिऱ्या समुद्रकिनारी मोठी दुर्घटना होता होता...
HomeRatnagiriशिक्षक भरतीनंतरही १०६३ पदे रिक्त जिल्हा परिषद…

शिक्षक भरतीनंतरही १०६३ पदे रिक्त जिल्हा परिषद…

२०२३-२४ या वर्षाकरिता मानधनावर तात्पुरते शिक्षक नेमले होते.

जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकभरती झाली असली तरी अजूनही ही भरती अपुरीच ठरणार आहे. मे महिन्यात रत्नागिरी जिल्हा परिषदेने ९९६ शिक्षकांची भरती केली. ही भरती होऊनही जिल्ह्यात अद्याप १ हजार ६३ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शून्य शिक्षकी शाळांचा प्रश्न संपला असला तरी एकशिक्षकी शाळांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यात शून्यशिक्षकी शाळा होऊ नये याकरिता रिक्त पदांनुसार शाळांना एक एक शिक्षक देताना शिक्षण विभागाला कसरत करावी लागत आहे. रत्नागिरी जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक पदे मोठ्या संख्येने रिक्त झाल्यामुळे अनेक शाळा शून्यशिक्षकी शाळा झाल्या होत्या.

मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता २०२३-२४ या वर्षाकरिता मानधनावर तात्पुरते शिक्षक नेमले होते. त्यानंतर जिल्ह्यात शिक्षकभरती झाली. आचारसंहितेमुळे शिक्षकभरती रखडली होती. मेमध्ये अखेर या शिक्षकभरतीला मुहूर्त मिळाला. समुपदेशनाद्वारे रत्नागिरी जिल्ह्यात ९९६ शिक्षकांची पदे भरण्यात आली. त्यामध्ये पहिली ते पाचवीपर्यंत ७१४ उपशिक्षक भरण्यात आले. सहावी ते आठवीपर्यंत २३० पदवीधर शिक्षक भरण्यात आले आणि उर्दूचे ५८ शिक्षक भरण्यात आले. जिल्ह्यात ९९६ शिक्षकांची भरती होऊनही १ हजार ६३ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे भरती होऊनही शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न कायम आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यात शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे पुन्हा शिक्षकांचा गोंधळ ग्रामीण भागात होणार आहे. सध्या जिल्हा परिषदेची कमान प्रशासनाकडे आहे. त्यामुळे तातडीने निर्णय घेण्यासाठी शासनाच्या निर्णयावर अवलंबून राहावे लागणार आहे; अन्यथा पुन्हा पालकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular