26.4 C
Ratnagiri
Monday, December 9, 2024

Huawei च्या Mate 70 मालिकेला प्रचंड मागणी, 67 लाखांहून अधिक युनिट्सचे बुकिंग

चीनी स्मार्टफोन निर्माता Huawei ने गेल्या महिन्यात...

शाहीद कपूरसोबत नॅशनल क्रश तृप्ती डिमरी झळकणार एका नव्या चित्रपटात

तृप्ती डिमरीचा यशस्वी प्रवास - तृप्ती डिमरीने...

IND vs AUS दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव

ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या पिंक बॉल कसोटी सामन्यात...
HomeRatnagiriशिक्षक बदलीने शिक्षकांची रिक्त पदे वाढणार

शिक्षक बदलीने शिक्षकांची रिक्त पदे वाढणार

आंतरजिल्हा बदल्यांमुळे ग्रामीण भागातील शाळा ओस पडू लागल्या आहेत.

जिल्हा परिषद शाळांच्या प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त पदांच्या भरतीची प्रक्रिया रखडलेली असतानाच आंतरजिल्हा बदलीचा सहावा टप्पा सुरू झाला आहे. त्यासाठी आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांना अर्ज करता येणार आहेत. गतवर्षी सुमारे पावणेचारशे शिक्षक बदलीने परजिल्ह्यात गेल्यामुळे जिल्हा परिषद शाळांमधील रिक्त पदांची संख्या वाढली आहे. यंदा पुन्हा ही प्रक्रिया सुरू झाल्यामुळे ग्रामीण भागातील शैक्षणिक दर्जाबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. ग्रामविकास आदेशामध्ये विभागाच्या अर्ज भरलेल्या शिक्षकांनाही अर्जात बदल करता येणार असल्याचे नमूद केले आहे. २०२२ मध्ये जिल्ह्यात जागा नसल्यामुळे हजारो शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज केला नव्हता.

नव्याने पात्र शिक्षकांना अर्ज करण्याची किंवा पर्याय बदलण्याची, संवर्ग बदलण्याची संधी द्यावी आणि ज्यांनी अर्ज केले आहेत, त्यांना त्यात बदल करण्याची संधी द्यावी, अशी मागणी शिक्षक सहकार संघटनेने ग्रामविकास, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली होती. त्यानुसार प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा सहावा टप्पा सध्या राबविण्यात येत आहे. त्यामध्ये २०२२ मध्ये ऑनलाईन अर्ज केलेल्या शिक्षकांचा विचार केला जाणार होता. त्यामुळे बदलीसाठी अर्ज न केलेल्या शिक्षकांना मोठा फटका बसणार असून अर्जात बदल करण्याची संधी शिक्षकांना द्यावी, अशी मागणी शिक्षकांनी वारंवार केली होती.

आंतरजिल्हा बदल्यांमुळे ग्रामीण भागातील शाळा ओस पडू लागल्या आहेत. गतवर्षी ७१५, त्याअगोदर ३५० असे गत ५ वर्षात जवळपास दीड हजारपेक्षा जास्त शिक्षण आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्याबाहेर गेले आहेत. येणाऱ्यांची संख्या मात्र ५ ते ६ इतकीच आहे. या बदल्या जिल्ह्यात वादाचा विषय बनला आहे. भरती नसल्याने रिक्त पदांची संख्या वाढतच निघाली आहे. सध्या दोन हजारपेक्षा जास्त रिक्त पदे आहेत. यामुळे ग्रामीण भागातील शिक्षणाची अवस्था फार बिकट बनली आहे. अनेक ठिकाणी एक शाळा आणि एक शिक्षक अशी स्थिती आहे.

RELATED ARTICLES

Most Popular