25.1 C
Ratnagiri
Saturday, February 7, 2026

निवडणुकीसाठी २२३ एसटी बस आरक्षित….

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शनिवारी...

नारायण तलावावर ‘तिसऱ्या डोळ्याची’ नजर चिपळूण नगरपालिकेचा पुढाकार

शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या नारायण तलाव परिसरात...

जगबुडी नदीकिनारा अस्वच्छतेच्या विळख्यात…

जगबुडी नदीकिनारी शासकीय जागेत मोठ्या प्रमाणात अनधिकृत...
HomeRatnagiriवडापची एसटी वाहतुकीला समांतर व्यवस्था, ग्रामीण भागातही वाढ

वडापची एसटी वाहतुकीला समांतर व्यवस्था, ग्रामीण भागातही वाढ

एसटी आणि खासगी वाहनचालक दोघांना तोटा सहन करावा लागत आहे.

तालुक्याच्या ग्रामीण भागातून शहरात आणि शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करण्यासाठी खासगी प्रवासी वाहतुकीचा आधार घेतला जात आहे. एसटीच्या उत्पन्नाचा मोठा स्रोत असलेला चिपळूण-रत्नागिरी मार्ग आता खासगी वाहनचालकांसाठी मोठा आधार बनला आहे. चिपळूणसह गुहागर, खेड, दापोली आणि मंडणगड एसटी आगाराच्या बस पंधरा ते वीस मिनिटांच्या अंतराने धावतात. त्याच दरम्यान खासगी वाहतुकीची वाहने. या मार्गावर धावतात; मात्र पुरेसे प्रवासी मिळत नसल्यामुळे एसटी आणि खासगी वाहनचालक दोघांना तोटा सहन करावा लागत आहे. तशीच अवस्था ग्रामीण मार्गाची झाली आहे. रत्नागिरीला जाण्यासाठी चिपळूणमधून सकाळी सहा वाजता पहिली खासगी बस आणि त्यानंतर एसटी सुटते. एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांसाठी महामंडळाने सवलत योजना जाहीर केल्यामुळे खासगी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना महिला प्रवासी मिळत नाहीत. पुढील प्रवासी एसटीला मिळू नये म्हणून खासगी बसचालक एसटीच्या पुढे जातात; मात्र त्यांना फारसे प्रवासी मिळत नाहीत. सर्वाधिक महिला प्रवासी एसटीनेच प्रवास करतात; मात्र त्यांचा प्रवास सवलतीचा असल्यामुळे एसटीला फारसे उत्पन्न मिळत नाही. सायंकाळी सात वाजेपर्यंत खासगी वाहतूक चालते.

रत्नागिरी मार्गावर चिपळूणमधून २५ खासगी वाहने धावतात. उत्तर रत्नागिरी भागातून जाणाऱ्या ग्रामीण ते राष्ट्रीय मार्गावर महामार्ग पोलिस, वाहतूक पोलिस असतात. त्यांची कसलीही आडकाठी खासगी वाहतूक करणाऱ्यांना होत नाही; मात्र चिपळूण ते रत्नागिरीदरम्यान महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांची काळजी घेत आणि यंत्रणेस सहकार्य करत खासगी वाहनांचा प्रवास सुरू आहे. रत्नागिरी मार्गावर एसटी आणि खासगी वाहनांची संख्या जास्त असली तरी हा मार्ग सर्वांसाठी तोट्याचा ठरला ठरत आहे. चिपळूण आगारातून ग्रामीण भागात १८ हजार किमी एसटीच्या फेऱ्या धावतात; मात्र ग्रामीण भागात धावणाऱ्या बसफेऱ्या कमी आहेत. याचा फायदा अवैध प्रवासी वाहतूकदार घेतात. पोफळी मार्ग, खेड तालुक्यातील पंधरागाव, रामपूर मार्गावर अवैध प्रवासी वाहतूक चालते. एसटी वेळेवर येत नसल्यामुळे ग्रामीण भागातील प्रवासी खासगी वाहतुकीला प्राधान्य देतात.

नाईलाजास्तव घ्यावा लागतो आधार – रत्नागिरी मार्गावर धावणाऱ्या बस २० ते ३० आसनी असतात. चिपळूण ते रत्नागिरी तिकीट दर १६० रुपये आहे. एसटीकडे सुरक्षीत प्रवास म्हणून पाहिले जाते. त्याला प्रवाशांचीही पसंती असते. मात्र, एसटीच्या मर्यादीत फेऱ्या असल्याने वेळेत एसटी मिळणे अवघड असते. त्यामुळे नोकदारवर्ग आणि विद्यार्थ्यांना नाईलाजास्तव वडापचा आधार घ्यावा लागतो. शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या पाल्यांबाबत पालकांना काळजी लागून राहते.

RELATED ARTICLES

Most Popular