26.7 C
Ratnagiri
Wednesday, February 5, 2025

ना. नितेश राणे आता भाजपचे रत्नागिरी जिल्हा संपर्कमंत्री

राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री...

पुन्हा केवायसीचा कार्डधारकांमागे ससेमिरा, शिधापत्रिकाधारकांतून नाराजी

रेशनकार्ड आधार ई-केवायसी करून घेण्याच्या सूचना शासनाकडून...

पालू लघुपाटबंधारे योजनेला मंजुरी, किरण सामंत यांचा पुढाकार

उन्हाळ्यामध्ये टंचाईग्रस्त भागात पहिला टँकर सुरू कराव्या...
HomeDapoliशिवसेना आम. वैभव नाईक यांचा पलटवार

शिवसेना आम. वैभव नाईक यांचा पलटवार

दापोली येथील मुख्यमंत्र्यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या समुद्र किनार्यालगतच्या बंगल्याचे बांधकाम अनधिकृत असून, त्यामध्ये सीआरझेड कायद्याच्या नियमांचे उल्लंघन झाल्याची तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली होती. त्या तक्रारीवरून संबंधित अनधिकृत बंगला आज जमीनदोस्त करण्यात आला. किरीट सोमय्या यांनी स्वतः ट्वीट माहिती दिली आहे.

या सर्व प्रकरणावर सर्व शिवसैनिक आक्रमक झाले असून, शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी भाजप नेते यांना किरीट सोमय्या यांना रोखठोक सवाल केला आहे कि, तुम्ही ज्या भाजप पक्षाचे काम करत आहात, त्याच पक्षाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा जुहू येथील अधिश बंगला पूर्णपणे अनधिकृत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तो बंगला वारंवार पाडण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. परंतू राणे स्वत: च्या बंगल्याचे बांधकाम पाडण्याचे धाडस दाखवू शकतील का?  आणि ते अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी तुमचे आवाज उठवण्याचे धाडस आहे का?

आम. वैभव नाईक पुढे सांगताना म्हणाले कि,  शिवसेना मुख्यमंत्री स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांनी राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचे चांगलेच डोळे उघडले आहेत. सध्याच्या जगात स्वतःच घर असण हि मोठी गोष्ट आहे, पण एखादी चूक होऊन अनधिकृत बांधकाम झाले तर ते पाडण्याचे धाडस देखील मिलिंद नार्वेकर यांनी स्वतः दाखवल आहे. त्यांना किरीट सोमय्यांनी सांगितल्याप्रमाणे अद्याप सीआरझेडची कोणतीही नोटीस आली नव्हती किंवा स्थानिक तलाठी किंवा तहसीलदार कार्यालयाची नोटीस आलेली नव्हती. किरीट सोमय्या यांनी सांगितले म्हणून त्यांनी ते बांधकाम पाडलं अस नाही असे आम. नाईक यांनी स्पष्ट केले. ते राजकीय क्षेत्रात कार्यरत असून, तहसीलदार, तलाठी यांच्यावर दबाव निर्माण करून, त्यांच्यावर आरोप लादले जातील म्हणून नार्वेकर यांनी स्वतःहून जेवढ बंगल्याच अनधिकृत बांधकाम आहे ते पडण्याचे धाडस दाखवले.

      किरीट सोमय्या महाराष्ट्रातील शिवसेनेच्या आमदार खासदार यांना नाहक त्रास देण्यासाठी केंद्राच्या तपास यंत्रणांचा गैरवापर करून अनेकांवर आरोप लावत सुटले आहेत. परंतु सद्य स्थितीला भाजपचे अनेक आमदार,  खासदार आणि लोकप्रतिनिधी यांचे देखील अनेक अनधिकृत बांधकामे आहेत. किरीट सोमय्या त्यावर देखील कारवाई करण्याचे धाडस दाखवतील का? सोमय्यांवर असा सरळ सवाल करून शिवसेना आम. नाईक यांनी घणाघाती पलटवार केला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular