25.6 C
Ratnagiri
Wednesday, September 3, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeRatnagiriदुहेरी हत्याकांडाने वैभववाडी तालुका हादरला, दोन कामगारांचा निघृण खून

दुहेरी हत्याकांडाने वैभववाडी तालुका हादरला, दोन कामगारांचा निघृण खून

क्रशरवर धनेश्वर चौधरी हे मुकादम म्हणून काम करीत होते.

दुहेरी हत्याकांडाने वैभववाडी तालुका हादरला. नाधवडे (ता. वैभववाडी) येथील क्रशरवर काम करणाऱ्या कामगाराने मुकादम आणि कामगाराचा निघृण खून केला. हा प्रकार बुधवारी (ता. ३०) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी संशयित संजय बाबूराव लोखंडे (वय ३८) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. धनेश्वर सत्यनारायण चौधरी (वय ६६) आणि मनोज सिंग (३०) अशी खून झालेल्यांची नावे असून, दोघेही नाशिक जिल्ह्यातील आहेत. याबाबतची अधिक माहिती अशी, नाधवडे येथे तळेरे-कोल्हापूरमार्गापासून एक किलोमीटरवर एक क्रशर आहे. या क्रशरवर धनेश्वर चौधरी हे मुकादम म्हणून काम करीत होते. क्रशरला कामगार पुरविण्याचा ठेका त्यांच्याकडे होता. क्रशरवर एकूण सात कामगार होते. हे कामगार एका शेंडमध्ये राहतात. बुधवारी सायंकाळी संशयित संजय लोखंडे आणि काही कामगारांमध्ये किरकोळ वाद झाला.

त्यानंतर सर्व कामगार आपआपल्या खोल्यांमध्ये गेले. रात्री पावणेअकराच्या सुमारास मुकादम धनेश्वर चौधरी राहत असलेल्या खोलीतून झटापटीचा आवाज ऐकू आल्याने कामगार तेथे गेले. खोलीचा दरवाजा आतून बंद होता. कामगारांनी खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, मुकादम धनेश्वर यांच्या पाठीवर बसून संशयित संजय चाकूचे वार करत असल्याचे दिसले, दरवाजा उघडताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, कामगारांनी त्याला एका खोलीत ढकलून दरवाजा बंद केला. त्यानंतर आणखी एक कामगार मनोज सिंग कोठे दिसत नसल्याचे लक्षात आल्याने त्याला फोन केला असता, २०० मीटर अंतरावर फोनचा आवाज आला. तेथे जाऊन पाहिले असता मनोजही मृतावस्थेत आढळला. त्याच्या अंगावर जखमा दिसत होत्या. ही माहिती कामगारांनी पोलिसांना दिल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल पोलिस पथकासह घटनास्थळी आले आणि त्यांनी संशयित संजय लोखंडेला ताब्यात घेतले.

RELATED ARTICLES

Most Popular