25.3 C
Ratnagiri
Friday, December 13, 2024

सावर्डेतील उद्योजकावर ‘जीएसटी’चा छापा…

सावर्डे परिसरातील बड्या उद्योजकावर जीएसटी विभागाने फिल्मी...

विहिंपच्या कार्यकर्त्यांनी रोखली गायींची तस्करी

पोमेडी परिसरातून पाच गायी आणि एक वासरू...

खाड्यांच्या मुखाशीच साचू लागला मोठ्या प्रमाणात गाळ

भारत आफ्रिकेपासून तुटला त्या वेळी ज्या भेगा...
HomeChiplunवंचित आघाडीच्या मोर्चाने अवघे चिपळूण दणाणले

वंचित आघाडीच्या मोर्चाने अवघे चिपळूण दणाणले

आमदार भास्कर जाधव यांनी जातीवाचक वक्तव्य केले.

शिवसेना नेते आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी जातीवाचक वक्तव्य केल्याचा गंभीर आरोप करत वंचित बहुजन आघाडीने त्याच्या निषेधार्थ गुरुवारी चिपळूण पोलीस स्थानकावर मोर्चा काढला. येत्या ८ दिवसांत आ. जाधवांवर गुन्हा दाखल न झाल्यास उग्र आंदोलन छेडतानाच कायदेशीर कारवाईचाही मार्ग अवलंबू असा इशारा देण्यात आला आहे.वंचित आघाडीच्या मोर्चाने अवघे चिपळूण दणाणले बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विकास तथा अण्णा जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांनी याबाबत पत्रकारांशी बोलताना, निवडणुकीच्या दरम्यान आ. भास्कर जाधव यांनी कळंबट येथील सभेत बौद्ध समाजाबाबत अपशब्द वापरला असा आरोप केला. अण्णा जाधव यांनी या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. मुंडण आंदोलनही केले होते. याचदरम्यान अण्णा जाधव यांच्यावर गुहागर येथे प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. यातील आरोपीना पोलिसांनी पकडले आहे. मात्र जातीवाचक शब्द वापरल्याचा आरोप असलेल्या आ. जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

हा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी गुरुवारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पोलीस स्थानकावर मोर्चा काढण्यात आला. आ. भास्कर जाधव यांच्या विरोधात जोरदार घोषणा देत मोर्चा चिपळूण पोलीस स्थानकावर धडकला. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी वंचीतच्या पदाधिकाऱ्यांनी मार्चेकऱ्यांसमोर भाषण केले. पोलिसांनी आ. जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल का केला नाही? ज्या ठिकाणी गुन्हा घडला त्या ठिकाणचे पुरावे असताना गुन्हा दाखल का केला जात नाही असे सवाल त्यांनी केले. यावेळी शिष्टमंडळाने डीवायएसपी राजेंद्र राजमाने याची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी आ. जाधव यांच्यावर जातीवाचक शब्द वापरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular