29.1 C
Ratnagiri
Wednesday, June 7, 2023

रत्नागिरीच्या समुद्रातून जाताना पकडलेल्या बोटीतील १,८०० शेळ्या-मेंढ्याचा मृत्यू

रत्नागिरीच्या समुद्रातून अवैध निर्यात करत असताना जप्त...

अरबी समुद्रात चक्रीवादळ कोकणासह मुंबईला फटका?

मान्सून मालदीवसह दक्षिण भारत व पश्चिम श्रीलंकालगत...
HomeRatnagiriसोमवारपासून कोकण मार्गावरून धावणार वंदे भारत एक्सप्रेस

सोमवारपासून कोकण मार्गावरून धावणार वंदे भारत एक्सप्रेस

चार दिवसांपूर्वी मुंबई-गोवा या कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेची यशस्वी चाचणी झाल्यानंतर ही रेल्वे नियमितपणे कधी सुरू होणार याबद्दल लोकांना कुतूहल होते. आता ही रेल्वे २९ मेपासून नियमितपणे सुरू होणार असल्याची माहिती रेल्वेकडून मिळाली आहे. या रेल्वेचा शुभारंभ मडगावहून होईल व पंतप्रधान नरेंद्र मोदी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील, असे कळते.

असे असेल वेळापत्रक या गाडीचे वेळापत्रक जाहीर झाले नसले तरी ही गाडी तेजस आणि जनशताब्दी एक्सप्रेसच्या वेळापत्रकाच्या आसपास चालवली जाण्याची शक्यता आहे. संभाव्य वेळापत्रकानुसार ही गाडी सीएसएमटी स्थानकावरून पहाटे ५.३० वा. सुटून मडगाव या स्थानकावर दुपारी १२:३० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ती मडगाव स्थानकावरून दुपारी १:३० वाजता सुटेल ती म डगाव स्थानकावर रात्री ८:३० वाजता पोहोचेल.

कुठे थांबणार? – या गाडीला कोणते थांबे असतील याबाबत माहिती उपलब्ध नसली तरी रत्नागिरी जिल्ह्यात २ तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ थांबा या गाडीला मिळण्याचे संकेत आहेत. ठाणे या स्थानकावर या गाडीला थांबा असेल. पनवेल या स्थानकाचे महत्व पाहता या गाडीला येथेही थांबा मिळण्याची शक्यता आहे. मात्र रेल्वे प्रशासनकडून थांब्याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही आहे.

RELATED ARTICLES

Most Popular