25 C
Ratnagiri
Monday, December 9, 2024

Huawei च्या Mate 70 मालिकेला प्रचंड मागणी, 67 लाखांहून अधिक युनिट्सचे बुकिंग

चीनी स्मार्टफोन निर्माता Huawei ने गेल्या महिन्यात...

शाहीद कपूरसोबत नॅशनल क्रश तृप्ती डिमरी झळकणार एका नव्या चित्रपटात

तृप्ती डिमरीचा यशस्वी प्रवास - तृप्ती डिमरीने...

IND vs AUS दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव

ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या पिंक बॉल कसोटी सामन्यात...
HomeRatnagiriफासकीत अडकलेल्या बिबट्याने अशी करून घेतली स्वतःची सुटका

फासकीत अडकलेल्या बिबट्याने अशी करून घेतली स्वतःची सुटका

लांजा तालुक्यातील आगवे येथे काजूच्या बागेत फासकीत अडकलेल्या बिबट्याने स्वत:च अतिशय जिकरीने सुटका करून घेत जंगलात धूम ठोकली.शनिवारी सकाळी हा प्रकार लांजा वनविभाग पथकासमोरच घडला.दरम्यान, फासकी लावणाऱ्याचा शोध वनविभागाने सुरू केला आहे. शनिवारी आगवे येथील पोलीस पाटील विजय जोशी यांनी लांजा वनखात्याला काजू बागेत फासकीत बिबटया अडकल्याची माहिती दिली. काजू बाग राखणदार जोशी यांनी पोलीस पाटील यांना अज्ञात इसमाने डुकरसाठी फासकी लावल्याचे सांगून त्यात बिबट्या अडकला असल्याची माहिती दिली होती. दरम्यान, खबर मिळताच लांजा वनक्षेत्र अधिकारी दिलीप आरेकर व अन्य वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बिबट्या फासकीतून सुटण्यासाठी प्रयत्न करत होता. त्याचे प्रयत्न अखेर यशस्वी झाले. सध्या काजू, आंब्याचा हंगाम सुरू असल्याने रानटी डुक्कर जनावरे काजू बोंडे खाण्यासाठी काजू बागेत येत असतात.

शिकार करण्यासाठी फासकी लावून शिकार सहजतेने करण्याचे प्रकार सुरू आहेत. पोलीस, वनविभागाने याबाबत कडक कारवाई मोहीम हाती घेतली होती. तंटामुक्ती पोलीस पाटील यांना आवाहन करण्यात आले होते. परंतु फासकीचे प्रमाण अधिक आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील बिबट्याच्या संख्येत वाढ झाली आहे ही दिलासादायक आहे. परंतु फासकीत व अन्य कारणाने होणारे बिबट्यांचे मृत्यू चिंताजनक आहेत. भक्ष्यांचा पाठलाग करताना बिबटे विहिरीत पडण्याचे प्रमाणही वाढले असून गेल्या ६ महिन्यांत उत्तर रत्नागिरीच्या तुलनेत दक्षिण रत्नागिरीत बिबटे वारंवार सापडू लागले आहेत. जिल्ह्यात गेल्या ७ वर्षांत विविध कारणांनी ३७ बिबटे मृत्युमुखी पडल्याची आकडेवारी वन विभागाकडूनच मिळाली आहे.

२०१० पासून आजपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात विविध कारणांनी ३७ बिबट्यांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात २३ ठिकाणी बिबटे फासकीत अडकले. त्यात गुरफटून ८ बिबट्यांचा मृत्यू झाला, तर जखमी झालेल्या १५ बिबट्यांवर औषधोपचार करून त्यांना सुखरूप जंगलात सोडून देण्यात आले. आतापर्यंत १७ ठिकाणी बिबटे विहिरीत पडण्याच्या घटना घडल्या. त्यात यावर्षीचे प्रमाण अधिक आहे. ४ बिबट्यांना जीव गमवावा लागला, तर १३ बिबटे सुखरूप बाहेर काढण्यात वन विभागाला यश आले. जिल्हाभरात गेल्या ७ वर्षात नैसर्गिकरीत्या १६ बिबट्यांचा मृत्यू झाला, तर रस्ता, रेल्वे अपघातात ७ बिबट्यांना जीव गमवावा लागला. आतापर्यंत शिकारीत ३ बिबटे मारले। गेल्याचीही नोंद आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात बिबट्यांची वाढती संख्या, तसेच वनखात्यासमोरील समस्या, खवले मांजरासारख्या प्राण्यांची शिकार व तस्करी, जंगलतोड, चोरटे लाकूड अशा अनेक बाबी वनखात्याला हाताळाव्या लागतात. त्यासाठी २६ वनरक्षक, १० वनपाल आणि ३ वनपरिक्षेत्र अधिकारी आहेत. बिबटे वाचविण्यासाठी अथवा मृत झाल्यास त्याची छाननी करण्यासाठी याच कर्मचाऱ्यांतील पथकाला धावून जावे लागते फासकी लावणे हा वन्यजीव कायद्यांतर्गत गुन्हा असून बिबट्या, जंगली प्राणी यांचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular