27.2 C
Ratnagiri
Sunday, June 8, 2025

गुकेश – कार्लसनमध्ये विजेतेपदासाठी चुरस – नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा

बुद्धिबळ स्पर्धेतील खुल्या विभागात अखेरच्या फेरीपर्यंत कमालीची...

रत्नागिरीत गांजा विक्रीसाठी आलेल्या तरूणाला पकडले…

पांढरा समुद्र परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला...

उध्दव ठाकरेंचे मनसेसोबत युतीचे स्पष्ट संकेत…

गेल्या दीड महिन्यांपासून उद्धव आणि राज ठाकरे...
HomeRatnagiriकोकण मार्गावर वंदे भारत'चा प्रवास १ नोव्हें. पासून आणखी वेगवान...

कोकण मार्गावर वंदे भारत’चा प्रवास १ नोव्हें. पासून आणखी वेगवान…

फेऱ्यामध्येही वाढ होणार असून आठवड्यातील शुक्रवार वगळता नियमितपणे कोकण मार्गावर धावणार आहे.

महागडा प्रवास असूनही कोकणवासीयांच्या सर्वाधिक पसंतीस उतरलेली सुपरफास्ट मुंबई- मडगाव वंदे भारत एक्सप्रेसचा वेग ९ नोव्हेंबरपासून वाढणार आहे. वंदे भारतचा प्रवास आता १० तासांवरून अवघ्या ७ तास ४५ मिनिटांवर येणार असून प्रवासात २ तासांची बचत होणार आहे. फेऱ्यामध्येही वाढ होणार असून आठवड्यातील शुक्रवार वगळता नियमितपणे कोकण मार्गावर धावणार आहे. पावसाळ्यात कोकण मार्गावर घडणाऱ्या तत्सम दुर्घटना टाळण्यासाठी १० जूनपासून पावसाळी वेळापत्रक लागू करत रेल्वेगाड्यांच्या वेगावर मर्यादा घालण्यात आल्या होत्या. कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांचा वेग ताशी ११० कि.मी. ऐवजी ताशी ७५ कि.मी. ठेवला होता.

पावसाळी वेळापत्रकामुळे आलिशान वंदे भारत एक्सप्रेसचाही वेग कमी करण्यात आला होता. तसेच फेऱ्याची संख्याही कमी करून एक्सप्रेस आठवड्यातून ३ दिवस चालवण्यात येत होती. २८ जूनपासून ५३० आसन क्षमता अमलेली डब्यांची आलिशान सीएसएमटी मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस कोकण मार्गावर सोमवार, बुधवार, शुक्रवार तर परतीच्या प्रवासात मंगळवार, बुधवार, शनिवारी धावत आहे. सुपरफास्ट वंदे भारत एक्सप्रेसच्या सुस्साट प्रवासासह अत्याधुनिक सोयीसुविधांमुळे एक्सप्रेसच्या सर्वच फेऱ्याना कोकणवासियांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. गणेशोत्सवातील सलग ९ दिवस एक्सप्रेसच्या फेऱ्याचे आरक्षणही हाऊसफुल्ल होवून गणेशभक्त प्रतीक्षा यादीवरच राहिले होते.

कोकण मार्गावरील पावसाळी वेळापत्रक ३१ ऑक्टोबरपासून संपुष्टात येणार आहे. यामुळे वंदे भारत एक्सप्रेससह सर्वच रेल्वेगाड्यांचा वेगही वाढणार आहे. पावसाळी वेळापत्रकानुसार २२२२९ क्रमांकाची सीएसएमटी मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस सकाळी ५ वाजून २५ मिनिटांनी सीएसएमटी स्थानकातून सुटून दुपारी ३.३० वा. मडगाव स्थानकात पोहचते. सीएसएमटी मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रवासात १० तासांचा वेळ लागत आहे. १ नोव्हेंबरपासून २२२२९ क्र. ची सीएसएमटी मुंबई – मडगाव वंदे भारत एक्सप्रेस सकाळी ५ वाजून २५ मिनिटांनी सुटून दुपारी १ वा. १० मिनिटांनी मडगावला पोहचेल. परतीच्या प्रवासात २२२३०क्र.ची मडगाव-सीएसएमटी मुंबई एक्सप्रेस मडगाव येथून दुपारी २.४० वा. सुटून रात्री १०.२५ वा. सीएसएमटी मुंबई स्थानकात पोहचेल. प्रवाशांना अधिकचाच फायदा होईल.

१ नोव्हेंबरपासून वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून ६ दिवस धावणार आहे. पावसाळी वेगमर्यादा उठवल्याने प्रवाशांना आणखी वेगवान प्रवासाचा अनुभव घेता येईल. मुंबईतून मडगावकडे गेलेली एक्सप्रेस त्याच दिवशी परत आल्यामुळे एका दिवसात काम आटोपून परत येणाऱ्या प्रवाशांना अधिकचाच फायदा होईल. फक्त एक्सप्रेसचा देखभालीचा दिवस शुक्रवार ठेवल्याने शनिवार, रविवारला लागून येणाऱ्या सुट्ट्यांचा लाभ घेवून प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांचा भ्रमनिरास होण्याची शक्यता आहे. हा दिवस बदलून मंगळवार किंवा बुधवार केल्यास रविवारला जोडून येणाऱ्या सुट्ट्यांमध्ये आणखी प्रवासी मिळतील.

RELATED ARTICLES

Most Popular