28.6 C
Ratnagiri
Friday, August 1, 2025

दिवा-चिपळूण मेमू’च्या जादा दोन फेऱ्या – कोकण रेल्वे

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्यरेल्वेने अतिरिक्त गणपती...

वाटद एमआयडीसीची वाटचाल समर्थनाच्या दिशेने

रत्नागिरी तालुक्यातील वाटद येथे एमआयडीसी प्रस्तावित करण्यात...

वाशिष्ठी नदीत उडी मारणाऱ्या नवदाम्पत्याचा शोध सुरूच

वाशिष्ठी नदीत उडी घेतलेल्या नवविवाहित दाम्पत्याचा गुरूवारी...
HomeRatnagiriकॉल ड्रॉपच्या समस्येने जिल्हावासीय हैराण

कॉल ड्रॉपच्या समस्येने जिल्हावासीय हैराण

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विविध कंपन्यांची नेटवर्क असूनसुद्धा कित्येक वेळा मोबाईल नेटवर्कचा खेळखंडोबा झालेला असतो. कोरोनामुळे सर्वच गोष्टी ऑनलाईन झाल्याने, अनेकजण ज्या कंपनीचे नेटवर्क चांगले आहे, त्याला प्रथम प्राधान्य देतात. कंपन्यांची आपापसात सुरु असलेली स्पर्धा ती वेगळीच. मोबाईलच्या रिचार्ज प्लान वरून तर प्रत्येक कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा सुरू असते.

ग्रामीण भागामध्ये तर अनेक कंपन्यांचे टॉवर उभे असून, त्यांना होणारा वीजपुरवठा काही वेळा खंडित झाला कि, संपूर्ण गाव आउट ऑफ नेटवर्क होते. अनेक तांत्रिक समस्यांमुळे सध्या कॉल ड्रॉपची समस्या अधिक प्रमाणात भेडसावत आहे. कधी तेथे असणाऱ्या बॅटरी चार्जिंगला अडथला निर्माण होतो तर मोबाईल टॉवरला वीजपुरवठा करणाऱ्या जनरेटरमध्ये इंधनच नसते. त्यामुळे नेटवर्क मिळणे कठीण होते. आणि त्याचे परिणाम मात्र निष्पाप ग्राहकांना सोसावे लागतात.

रत्नागिरी जिल्हा विविध प्रकारच्या नेटवर्कच्या जाळ्याने एकमेकांशी जोडलेला आहे. परंतु, वीज आणि नेटवर्कच्या समस्या जास्त प्रमाणात पावसाळी ऋतूमध्ये जाणवतात. जिल्ह्यातील अनेक गावे अगदी डोंगरदरयांच्या पायथ्याशी स्थित आहेत. तेथे मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क शोधणे म्हणजे कठीणच. पावसाळ्यामध्ये जिल्ह्यात विजेचा लपंडाव जास्त असतो, ग्रामीण भागामध्ये तर हे प्रमाण खूपच असते. पाऊस जास्त झाला, वारे जोराने वाहिले, वीज पडली कुठे कि, आली तर २ तासांमध्ये वीज येते नाहीतर, दोन दोन दिवस वीज गायब असते. त्यामुळे अनेक यांत्रिक गोष्टी बंद पडल्याने अनेक प्रकारे नुकसान होते.

जिल्ह्यात सुरु असलेली रस्त्यांची खोदकामामुळे जमिनीखालील ऑप्टिकल फायबर केबल तुटून जातात. त्यामुळे मधीच फोन सुरु असताना बंद पडणे, मधीच समोरच्याच बोलण ऐकू न येणे, फोन कट होणे अशा एक ना अनेक समस्याना ग्राहकांना तोंड दयावे लागते.

RELATED ARTICLES

Most Popular