23.2 C
Ratnagiri
Monday, December 23, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeRatnagiriवेळणेश्वर समुद्रकिनारी बंद बरणीत स्फोटके, बॉम्ब शोध नाश पथकाला पाचारण

वेळणेश्वर समुद्रकिनारी बंद बरणीत स्फोटके, बॉम्ब शोध नाश पथकाला पाचारण

त्या बरणीमध्ये असलेली वस्तू ही जहाजावरील हॅन्ड हेल्ड रॉकेट पॅरॅशूट असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

आज सकाळी वेळणेश्वरचे सरपंच नवनीत ठाकूर हे फेरफटका मारत असताना गुहागर येथील वेळणेश्वर समुद्रकिनारी त्यांना एक बंद बरणी दिसली, त्या बंद बरणीची जवळून पाहणी केली असता त्या बंद बरणीमध्ये काही स्फोटक सदृश्य वस्तू असल्याचे निदर्शनास आले. सरपंचानी तात्काळ याबाबत गुहागर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जाधव यांना माहिती दिली. त्यानंतर जाधव यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचासह तात्काळ वेळणेश्वर समुद्रकिनारा गाठला आणि त्या बरणीची पाहणी केली.

त्या बरणीमध्ये असलेली वस्तू ही जहाजावरील हॅन्ड हेल्ड रॉकेट पॅरॅशूट असल्याचे त्यांच्या लक्षात आले. समुद्रामध्ये मोठ्या जहाजावर ज्या वेळेला एखादे संकट येतं त्या वेळेला आपल्या ठिकाणाचा पत्ता दाखवण्यासाठी किंवा दर्शवण्यासाठी हॅन्ड हेल्ड रॉकेट पॅरॅशूट चा वापर केला जातो. हे त्यावेळी हवेमध्ये उडवून त्याचा स्फोट घडवून आपण या ठिकाणी आहोत हे दर्शवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. त्यावेळी त्यांनी त्वरित रत्नागिरी येथील बॉम्ब शोध नाशक पथक आणि श्वान पथक यांना त्वरित पाचारण केलं. त्यानंतर त्या पथकाने ती वस्तू मोकळ्या जागेत वेळणेश्वर येथील समुद्रकिनारी निकामी केली.

अशा प्रकारे पोलिसांच्या गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावरील स्फोटक वस्तू त्वरित निदर्शनास आणून देणारे सरपंच नवनीत ठाकूर यांच्यावर सध्या सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसेच यावेळी गुहागरचे पोलीस निरीक्षक जाधव, एपीआय  जाधव, पीएसआय  कांबळे, विशाल वायंगणकर, वैभव चौगुले, कुमार घोसाळकर, आशिष फुटक  आधी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular