अनेक विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या अंतर्गत गुणांचा त्यांना भविष्यात उपयोग होतो. विविध क्षेत्रांमध्ये काहीतरी वेगळ करून दाखवण्याची इच्छा मनाशी बाळगून त्यासाठी लहानपणापासूनच त्यासाठी कष्ट करायला सुरुवात करतात. त्यामुळे मिळणारे यश सुद्धा दणदणीत असते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका मुलीने देखील अनोखा विक्रम करून आपले नाव विश्वविक्रमावर कोरले आहे. लहान वयामध्ये हा रेकोर्ड बनवल्यामुळे तिच्या नावाची नोंद विश्वविक्रमामध्ये करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेंगुर्ल्याच्या सागर कन्येने विश्वविक्रम केला आहे. १४ वर्षाच्या स्नेहा नार्वेकरने वेंगुर्ल्यातील अरबी समुद्रामध्ये बॅक किक स्विमिंग करत २० मिनिटांमध्ये १२ रुबिक क्यूब यशस्वीपणे सॉल्व्ह केले. हा विश्वविक्रम करणारी स्नेहा ही भारतातील पहिलीच किशोरवयीन मुलगी आहे. तिच्या या कामगिरीची वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडियाने सुद्धा नोंद घेतली आहे. तिला सर्टिफिकेट आणि मेडल देऊन गौरवण्यात आलं आहे.
आठवीत शिकणारी स्नेहा वयाच्या चौथ्या वर्षापासून स्विमिंग करते. घरची परिस्थिती देखील बेताचीच आहे. स्नेहाचे वडील शेतकरी आहेत तर तिची आई गृहिणी आहे. त्यामुळे तिला घरातून तशी खास ट्रेनिंग देणारं कुणं नाही. मात्र दिपक सावंत यांनी स्नेहामधलं पोहण्याचं कौशल्य पाहिलं आणि तिला ट्रेन केलं. कोचची ट्रेनिंग आणि स्वत:च्या जिद्दीच्या जोरावर स्नेहाने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. अगदी कमी वयात नवा आगळा वेगळा विक्रम करणाऱ्या स्नेहाचं सर्व स्थरातून कौतुक होतंय.
स्वीमिंगच्या आवडीमुळे त्यासोबतच काही नवीन करावे असे मनाशी बाळगल्याने क्यूब बनवण्यामध्ये विविध प्रकारचे ट्रेनिंग घेऊन आणि सराव करून तिने हे अभूतपूर्व यश संपादन केले असून एक अभूतपूर्व विक्रम रचला आहे.