22.2 C
Ratnagiri
Monday, January 26, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeSindhudurgवेंगुर्ला पोलिसांची धडक कारवाई, लाखो रुपयांची गोवा बनावटी दारू जप्त

वेंगुर्ला पोलिसांची धडक कारवाई, लाखो रुपयांची गोवा बनावटी दारू जप्त

वेंगुर्ला तालुक्यात पुन्हा एकदा लाखो रुपयांच्या गोवा बनावटी दारूची विक्री आणि वाहतूक होते हे ताज प्रकरण समोर आले आहे.

वेंगुर्ला तालुक्यातील घोडेमुख देवस्थानसमोरील, मळेवाड ते सावंतवाडी जाणारे रोडवर आज १५ जून रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास वेंगुर्ले पोलिसांनी सापळा रचून मारूती सुझूकी कंपनीची स्वीप्ट कार मधून नेण्यात येणारे गोवा बनावटी दारूचे ५४ बॉक्स पकडले. वेंगुर्ले पोलिस कोल्हापूर मधील दारू साठा हस्तगत करण्याच्या घटनेने प्रेरित झाले असून, त्यांनी आज पहाटे पेट्रोलिंग दरम्यान घोडेमुख येथे गोवा बनावटी दारूसह पाच लाखाचा मुद्देमाल जप्त केला असून एकाला ताब्यात घेतले आहे.

यातील गाडी चालक सावंतवाडी तालुक्यातील किनळे खालचीवाडी येथील तुकाराम न्हानू नाईक यांच्यासह गाडी व दारुसह सुमारे ५ लाख २८ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. आणि वेंगुर्ले पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारबंदी अधिनियम कलम ६५ (अ)(ई),८१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस कॉन्स्टेबल अमर विष्णु कांडर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की तुकाराम उर्फ आजो न्हानू नाईक हा आपल्या ताब्यातील मारूती सुझूकी कंपनीची स्वीप्ट चारचाकी गाडी नं GA ०७ C २६५५ मधून वरील किंमतीची गोवा बनावटीची दारू घेऊन जात होता. पेट्रोलिंग दरम्यान घोडेमुख मंदिर समोर रस्त्यावर त्या गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये गोवा बनावटी दारूचे बॉक्स आढळले. त्यामुळे त्यास मुद्देमालासह ताब्यात घेतले.

दरम्यान वेंगुर्ला तालुक्यात पुन्हा एकदा लाखो रुपयांच्या गोवा बनावटी दारूची विक्री आणि वाहतूक होते हे ताज प्रकरण समोर आले आहे. दोन दिवसात तब्बल २५ लाखाचा गोवा बनावट दारूचा साठा आढळून आला. त्यामुळे याविरोधात आता वेंगुर्लेचे नूतन पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. त्याच प्रमाणे शहरात पाळमूळ पसरवू लागलेल्या अमली पदार्थाच्या विरोधातही आत्ताच कडक मोहीम राबवावी अशीही मागणी होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular