24.8 C
Ratnagiri
Friday, February 6, 2026

रत्नागिरीत पार्किंगच्या जागेत बाग – स्मार्ट सिटी योजना

शहरातील मारुती मंदिर स्टेडियमच्या बाजूला असणाऱ्या पार्किंगच्या...

विमान अपघाताच्या चौकशीत धक्कादायक बाब आली समोर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीला...

शनिवारच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज, पोलिसांचांही तगडा बंदोबस्त

रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक...
HomeRatnagiriसंगमेश्वरमध्ये अत्यंत चुरशीच्या लढती ३३ वर्षांनंतर सत्तांतर होणार का याकडे लक्ष

संगमेश्वरमध्ये अत्यंत चुरशीच्या लढती ३३ वर्षांनंतर सत्तांतर होणार का याकडे लक्ष

या गटात विद्यमान आमदार शेखर निकम यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

शिवसेनेत फुट पडल्याने गत ३३ वर्षे पंचायत समितीचे सत्ताधारी असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पायउतार करण्यात महायुतीला यश येणार का? याचीच चर्चा सध्या मतदारांमध्ये सुरू आहे. सर्वत्र चुरशीच्या लढती होत असल्याने कोण बाजी मारणार याचा अंदाज वर्तविणे कठीण जात आहे. धामापूर तर्फे संगमेश्वर जि.प. गटात उबाठाकडून मागील जि.प. निवडणुकीत विजयी झालेले पण नंतर राजिनामा देत पक्ष बदलत गुहागर मधुन २०१९ मध्ये विधानसभा निवडणूक लढवत माजी मंत्री आ. भास्कर जाधव यांना जोरदार लढत देणारे सहदेव बेटकर हे पुन्हा घरवापसी करत रिंगणात आहेत. त्यांची राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुशिल भायजे यांचेसह अजित कांबळे (वंचित), जगन्नाथ राऊत (अपक्ष) यांच्याशी चौरंगी लढत असली तरी खरा मुकाबला उबाठा विरूद्ध राष्ट्रवादीतच होणार असल्याचे चित्र आहे. या गटात विद्यमान आमदार शेखर निकम यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

कडवईत काय होणार? – उबाठा सेनेचा बालेकिल्ला सम-जला जाणाऱ्या कडवई गटात तिरंगी लढत होत आहे. उबाठाचे आक्रमक नेतृत्व असलेले माजी जि.प. उपाध्यक्ष संतोष थेराडे यांची खरी लढत भाजपाचे तालुकाध्यक्ष विनोद म्हस्के. व आशिष सुर्वे (काँग्रेस) यांच्यात होणार आहे.

महाडिकांचा बालेकिल्ला – कसबा संगमेश्वर गट हा १९९२ पासून राजू महाडीक यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्याच्या पत्नी व माजी जि.प. अध्यक्षा सौ. रचना महाडीक या शिवसेनेकडून रिंगणात असून त्यांची थेट लढत उबाठाच्या विशाखा कुवळेकर यांचेशी होणार आहे. ही लढत एकतर्फी वाटत असली तरी उबाठासेनेची असलेली ताकद तसेच कुणबी व मुस्लिम फॅक्टर कसा चालतो यावरच येथील विज़याचे गणित अवलंबून आहे. या गटाच्या लढतीकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

मुचरीत कोण बाजी मारणार? – मुचरी गटात तिरंगी लढतीत महायुतीकडून माजी जि.प. सदस्या माधवी गीते यांची राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या नवख्यापण उच्च शिक्षित अन्यायाविरुद्ध आक्रमकपणे लढणाऱ्या अशी ओळख निर्माण केलेल्या उबाठा सेनेच्या ललीता तांबे यांचेशी थेट लढत होणार असल्याचे दिसून येते असले तरी अपक्ष लढत असलेल्या सामाजिक कामात अग्रेसर असलेल्या नृपूर मुळे यांनी निर्माण केलेले आव्हान निश्चितच सोपे नाही. त्यामुळे येथील विजयाचे गणित बद्लू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

भाजप विरूद्ध शिवसेना – साडवली गटात भाजपकडून रुपाली कदम या नवख्या असल्या तरी माजी जिप अध्यक्ष रश्मी कदम यांच्या सुनबाई असून भाजपाचे तालुकाध्यक्ष रूपेश कदम यांच्या पत्नी आहेत. तर उबाठा सेनेकडून माजी मंत्री रवींद्र माने. याच्या पत्नी व माजी जि.प. सदस्या नेहा माने यांच्यात थेट लढत होणार असून या गटात रश्मी कदम व माजी मंत्री रवींद्र माने यांची कसोटी पणाला लागणार आहे.

विलास चाळकेंना आव्हान – दाभोळे गटात माजी जि.प. सदस्य व महायुतीचे विलास चाळके यांची वंचित बहुजन आघाडीच्या नवख्या असलेल्या विरश्री बेटकर या विरोधात उभ्या ठाकल्या आहेत. त्या उबाठाच्या मदतीने कीती आव्हान उभे करतात हे पाहणे महत्वपूर्ण ठरणार आहे.

रंगतदार लढत – धामापूर गणात उबाठाचे अजय चव्हाण यांचे समोर भाजपाचे महेश जड्यार यांचे आव्हान आहे तर आरवली गणात उबाठाच्या स्मिता कुंभार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रिया बेर्डे अशी रंगतदार लढत होणार आहे. कडवई गणात उबाठाच्या अपर्णा जाधव या शिवसेनेच्या सुचिता कदम अशी लक्षवेधक लढत पाहायला मिळत आहे. धामणी गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष भडवळकर व उबाठाचे दत्ताराम लाखण अशी चुरशीची लढत होणार आहे.

कसबा गणात चुरस – कसबा गणात शिवसेनेचे सुरेश माईन यांचेसमोर उबाठाचे चंद्रकांत फणसे व अपक्ष संदेश झिमण यांचे आव्हान आहे. तर परचुरी गणातून शिवसेनच्या शर्वरी वेल्ये यांना उबाठाच्या पुजा शितप यांचेशी सामना करावा लागणार आहे. माभळे गणात भाजपातून उबाठात प्रवेश केलेल्या दिलिप गीते यांचा सामना शिवसेनाच्या सुहास मायंगडे या तगड्या उमेद‌वाराशी होणार आहे. या गणातून माजी सभापती दिलीप पेंढारी हे उबाठाकडून निवडणूक लढविणार होते. तसा शब्द दिला होता. पण आयत्यावेळी भाजपातून आलेल्या दिलिप गीतेंना दिल्याने त्यांनी आपली उमेदवारी मागे घेत थेट शिंदे गटात प्रवेश केल्याने मायंगडे यांचा माग सुकर होईल अशी चर्चा सुरू आहे-मुचरीगणात उबाठाच्या प्रज्ञा गमरे यांचेसमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आरूची घवाळी यांचे कडवे आव्हान उभे आहे. कोसुंब गणात उबाठाकडून सुहासिनी भाताडे यांना भाजपाच्या दुर्वा पाष्टे यांचे आव्हान आहे. दोन्ही उमेदवार या देव धामापूर गावातीलच असल्याने या लढतीत कोण बाजी मारणार याकडे लक्ष वेधले आहे.

निवे गणात चुरशीची लढत – निवे गणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल बाईत वः उब्बाठाचे सुरेश गुर्ख अशी थेट चुरशीची लढत होते आहे. साडवली गणात पालकमंत्री उदय सामंत यांचे निकटवर्तीय मानले जाणारे शिवसेनेचा आक्रमक चेहरा असलेले सचिन मांगले यांच्या पत्नी तृप्ती मांगले – यांची लढत उबाठाचे युवासेनेचे नेते व माजी सभापती छोट्या गवाणकर होत असल्याने या लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. यांच्या पत्नी क्षमा जाधव यांच्याशी

हातीवमध्ये कडवे आव्हान – हातीव गणात आम. शेखर निकम यांचे निकटवर्तीय मंगेश बांडागळे हे राष्ट्रवादी कडून रिंगणात उतरले असून त्यांना उबाठा शिवसेनेचे प्रदिप ढवळ यांचे कडवे आव्हान असेल. कोंडगाव गणात माजी सभापती जयसिंग माने हे शिवसेनेकडून, रींगणात उतरले आहेत त्यांची उबाठाचे विद्यासागर तांदळे यांचेशी गाठ पडणार आहे. दाभोळेतून शिवसेनेच्या दिपाली जाधव यांचे समोर अपक्षांचे आव्हान आहे. या निवडणुकीत ६ गणात उबाठा विरूद्ध शिवसेना अशी थेट लढत होणार आहे. तर ५ गणात राष्ट्रवादी तर २ गणात भाजपा विरूद्ध उबाठा अशा लढती रंगणार आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular