25.3 C
Ratnagiri
Friday, December 13, 2024

सावर्डेतील उद्योजकावर ‘जीएसटी’चा छापा…

सावर्डे परिसरातील बड्या उद्योजकावर जीएसटी विभागाने फिल्मी...

खाड्यांच्या मुखाशीच साचू लागला मोठ्या प्रमाणात गाळ

भारत आफ्रिकेपासून तुटला त्या वेळी ज्या भेगा...

फूलकीड नियंत्रणासाठी आठ आंबा बागांत प्रयोग

गेली काही वर्षे हापूसवर होणाऱ्या फूलकिडीवर (थ्रिप्स)...
HomeRatnagiriविहिंपच्या कार्यकर्त्यांनी रोखली गायींची तस्करी

विहिंपच्या कार्यकर्त्यांनी रोखली गायींची तस्करी

वाहनातील पाचपैकी एक गाय मृत पावल्याचे लक्षात आले.

पोमेडी परिसरातून पाच गायी आणि एक वासरू असलेले चारचाकी वाहन विहिंपच्या कार्यकत्यांनी रोखले. त्यातील दोन जणांना पकडल्यावर वाहनचालकाने वाहनासह तेथून पोबारा केला. ते वाहन चिपळूण पोलिसांनी पकडून गुहागर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच कालावधीत पोमेंडीत विहिंपच्या कार्यकर्त्यांची नजर चुकवून एक जण पळत होता. त्याला रात्रीची गस्त घालणाऱ्या गुहागर पोलिसांनी जेरबंद केले. या थरारक धावपळीत एका गायीचा नाहक बळी गेला. बुधवारी रात्री १ ते ३.३० पर्यंत थरारनाट्य सुरू होते. या प्रकरणी गुहागर पोलिसांनी हिदायत जनिरुद्दिन उलदे (चालक), जावेद हुसेन दाऊद वाळवटकर, आनस अब्दुल रशीद खतीब सर्वजण (रा. मुरूड, रायगड), संदीप सीताराम पालशेतकर (मार्गताम्हाणे) आणि नीलेश गणपत काताळकर (पोमेंडी) यांना अटक केली. न्यायालयाने पाच जणांची जामिनावर मुक्तता केली. वाहन मालकाला परत देण्याचे आदेश दिले.

गुहागर तालुक्यातील पोमेंडी परिसरातून एक टेम्पो बुधवारी रात्री १च्या सुमारास वेळंबच्या दिशेने चालला होता. पोमेंडीतील विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते श्रीराम विचारे यांना गायींच्या तस्करीची माहिती मिळाली होती. त्यानुसार विहिंपचे कार्यकर्ते पाळत ठेवून होते. पोमेंडीत आलेल्या वाहनाचा संशय आल्याने विचारे यांनी हे वाहन थांबवले. या वेळी पोमेंडीचे पोलिस पाटील सुरेश विचारे त्यांच्यासोबत होते. वाहनाची तपासणी केल्यावर त्यामध्ये गायी दिसून आल्या. वाहनातून दोन जण उतरले व त्यांनी वाहन सोडून देण्यासाठी खोटीनाटी कारणे सांगितली. पैशाचे आमिष दाखवले; मात्र विचारे आणि मंडळी ठाम होती. गुरांची वाहतूक करण्याचा परवाना आहे का, असे विचारत विचारे आणि त्यांच्या साथीदारांनी दोघांना अडवले. तसा वाहनचालकाने वाहनासह पोबारा केला. हे लक्षात येताच विहिंपच्या कार्यकर्त्यांनी कोकण प्रांत सहमंत्री अनिरुद्ध भावे यांना कळवले. भावे यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी राजमाने यांना दूरध्वनीवरून गो तस्करी करणारे वाहन घेऊन चालक पसार झाल्याचे सांगितले. राजमाने यांनी तातडीने नाकाबंदीचे आदेश दिले. चिपळूण बायपास येथे हे वाहन चिपळूण पोलिसांनी पकडले.

जनावरे गोशाळेत – सकाळी गुहागर पोलिसांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना गायींची तपासणी करण्यासाठी बोलावले, तेव्हा वाहनातील पाचपैकी एक गाय मृत पावल्याचे लक्षात आले. विजय नागवेकर आणि गुहागर पोलिसानी गायी व वासरू लोटे येथील कोकरे महाराजांच्या गोशाळेत सोडले.

RELATED ARTICLES

Most Popular