27.9 C
Ratnagiri
Saturday, June 7, 2025

गुकेश – कार्लसनमध्ये विजेतेपदासाठी चुरस – नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा

बुद्धिबळ स्पर्धेतील खुल्या विभागात अखेरच्या फेरीपर्यंत कमालीची...

रत्नागिरीत गांजा विक्रीसाठी आलेल्या तरूणाला पकडले…

पांढरा समुद्र परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला...

उध्दव ठाकरेंचे मनसेसोबत युतीचे स्पष्ट संकेत…

गेल्या दीड महिन्यांपासून उद्धव आणि राज ठाकरे...
HomeEntertainmentबिग बॉस मराठी तिसऱ्या पर्वाचा विजेता घोषित

बिग बॉस मराठी तिसऱ्या पर्वाचा विजेता घोषित

छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’  मराठी हा सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक समजला जातो. बिग बॉस हिंदी प्रमाणेच याची सुद्धा लोकप्रियता खूप आहे. बिगबॉस मराठीचे हे तिसरे पर्व सुरु आहे. यावर्षीच्या तिसऱ्या पर्वातील बिग बॉस मराठीचा विजेता कोण होणार?  याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते.

२६ डिसेंबर संध्याकाळी ७ वाजल्यापासून बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्याला सुरुवात झाली. या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वात सहभागी झालेले सर्व स्पर्धक या कार्यक्रमाच्या सांगता समारंभाच्या वेळी उपस्थित होते. प्रेक्षकांना या सर्व स्पर्धकांचा नृत्याविष्कार पाहायला मिळाला.

बिग बॉस मराठीच्या या सोहळ्याचे संपूर्ण सूत्रसंचालनाची धुरा महेश मांजरेकर यांनी सांभाळली. त्यासोबतच त्यांनी यंदाची बिग बॉसची ट्राफी यावर्षी कशी असणार याची झलकही दाखवण्यात आली. त्यानंतर बिग बॉसमधील मिनल शहा, विशाल निकम, विकास पाटील. जय दुधाणे आणि उत्कर्ष शिंदे या टॉप ५ स्पर्धकांचा जबरदस्त नृत्याविष्कार पाहायला मिळाला.

यादरम्यान मिनल शहा ही बिग बॉस मराठीच्या स्पर्धेतून बाहेर पडली. त्यानंतर उत्कर्ष शिंदेंनेही कार्यक्रमातून एक्झिट घेतली. त्यामुळे विकास, विशाल आणि जय हे तिघेजण टॉप ३ चे स्पर्धक उरले. दरम्यान या तिघांमध्ये सुरुवाती पासूनच चुरशीची लढत पाहायला मिळत होती. यातील विकास पाटील हा यावेळी स्पर्धेतून बाहेर पडला.

अखेर आज बिग बॉस मराठीच्या विजेत्याची घोषणा झाली. विशाल निकम या स्पर्धकाचे नाव बिग बॉस मराठी तिसऱ्या पर्वाचा विजेता म्हणून घोषित करण्यात आले. त्याला बक्षीस म्हणून बिग बॉसची ट्रॉफी आणि २० लाख रुपये बक्षिसाची रक्कम म्हणून देण्यात आली.

RELATED ARTICLES

Most Popular