24.7 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

दहावी, बारावी बोर्ड परीक्षेसाठी राजमार्ग

कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश...

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नोटिसा…

आपापल्या जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्रांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका...

पूररेषेतील बांधकामांसाठी अटीत शिथिलता

शहरातील पूररेषेतील बांधकामांसाठी नगरविकास खात्याच्या नियमांमध्ये शिथिलता...
HomeRatnagiriविक्रांत जाधव शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नवे जिल्हाप्रमुख

विक्रांत जाधव शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नवे जिल्हाप्रमुख

जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांतून मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी गर्दी केली होती.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रत्नागिरी जिल्हाप्रमुख पदी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि युवा सेना कोअर कमिटी सदस्य विक्रांत जाधव यांची शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही निवड केली आहे. या निवडीनंतर चिपळूण येथील संपर्क कार्यालयात विक्रांत जाधव आले असता शिवसेना नेते, आमदार भास्करराव जाधव यांनी त्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. विक्रांत जाधव यांनी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून कमी कालावधीत अत्यंत प्रभावशाली अशी कामगिरी केली. जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी या काळात केले. मंत्रालय स्तरावर बैठका घेऊन अनेक धोरणात्मक त्यांच्या निर्णय त्यांनी अध्यक्षपदाच्या काळामध्ये घेतले.

आज जिल्हा परिषदेची दिमाखदार इमारत उभी राहत आहे, त्याचे श्रेय देखील विक्रांत जाधव यांना जाते. त्यांच्याच प्रयत्न व पाठपुराव्यामुळे या इमारतीला निधी मंजूर होऊ शकला. शिवसेना नेते आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विक्रांत जाधव यांना राज्य पातळीवर युवा सेनेच्या कोअर कमिटीमध्ये समाविष्ट करून घेतले. या काळात त्यांनी कोकणासह राज्याच्या वेगवेगळ्या भागांचा दौरा करून युवा सेनेचे संघटन अधिक बळकट करण्यासाठी मेहनत घेतली. प्रशासकीय कामकाजाची असलेली उत्तम जाण, अभ्यास आणि त्याचबरोबर संघटन कौशल्य त्यामुळे प्रशासन व संघटन अशा दोन्ही ठिकाणी त्यांनी आपली छाप पाडली आहे.

त्यामुळे पक्ष संघटनेत त्यांनी जिल्हा पातळीवरील जबाबदारी स्वीकारावी, अशी इच्छा पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांची होती. विक्रांत जाधव यांची निवड करून उध्दव ठाकरेंनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची इच्छा पूर्ण केल्याची चर्चा सुरू आहे. या निवडीनंतर गुरूवारी विक्रांत जाधव हे शिवसेना संपर्क कार्यालयात आले असता त्यांच्या स्वागतासाठी चिपळूण, गुहागरसह जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांतून मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी गर्दी केली होती. त्यांनी फटाके वाजवून या निवडीचा आनंद व्यक्त केला आणि विक्रांत जाधव यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES

Most Popular