31.3 C
Ratnagiri
Monday, March 24, 2025

मुंबईसमोर चेन्नईचे फिरकीचे जाळे ? सलामीलाच आमनेसामने

सर्वाधिक आणि प्रत्येकी पाच वेळा आयपीएल जिंकणारे...

घरपट्टी थकवणाऱ्या ६४ मालमत्ता सील रत्नागिरी पालिकेची कारवाई

घरपट्टी वसुलीच्या दृष्टीने रत्नागिरी पालिका अॅक्शन मोडवर...

कोकणात लवकरच ‘मालवणी भाषा भवन’ उभारणार : ना. नितेश राणे

कोकण साहित्यिकांची भूमी आहे. अनेक साहित्यिक या...
HomeKhedखेडवासीयांना पूरमुक्तीची आशा; २ कोटी ८४ लाखांचा निधी मंजूर

खेडवासीयांना पूरमुक्तीची आशा; २ कोटी ८४ लाखांचा निधी मंजूर

प्रत्यक्ष हे काम येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे.

शहराला पावसाळ्यात जगबुडी नदीला येणाऱ्या भरतीमध्ये पुराचा बसणारा फटका बसू नये, म्हणून नदी पात्रातील गाळ उपसण्यासह बेटे काढण्याचे काम राज्य सरकारने गेल्या वर्षापासून हाती घेतले असून, गतसाली पावसाळा सुरू होण्यापूर्वी थोडे दिवस आधीच या कामाला मंजुरी मिळाली होती. त्यामुळे प्रभावीपणे हे काम होऊ शकले नव्हते. परंतु, ना. योगेश कदम यांनी या कामासाठी आग्रही भूमिका घेतली होती. त्याम ळे गेल्या वर्षीच २ कोटी ८४ लाख रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली होती. आता सोमवार, ३ रोजी गाळ काढण्याच्या कामाची जगबुडी नदीतील गाळ उपशाच्या कामाची चाचणी घेतली. प्रत्यक्ष हे काम येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे.

जगबुडी नदीपात्रातील पूरमुक्त खेड शहराची संकल्पना सत्यात उतरण्यासाठी आशेचा किरण दिसू लागला आहे. खेड शहर जगबुडी व नारिंगी या दोन नद्यांच्या किनाऱ्यावर वसले आहे. या दोन शहराला अनेकदा पुराचा फटका बसतो. अनेक वर्षांपासून सह्याद्रीच्या रंगातून जगबुडी नदीने वाहून आणलेला गाळ नदीच्या या भागातील पात्रात साचला आहे. गेल्या १० वर्षांत नदीतील गाळ काढण्याची मागणी जोर धरू लागली आहे. गतवर्षी गाळ काढण्याच्या कामाला शासकीय यंत्रणांनी हिरवा दिवा दाखवला. मात्र, निधी मंजुरी व परवानग्या पावसाळा सुरू होण्यास काही दिवसच शिल्लक असताना मिळाल्याने कामाबाबत शंका उपस्थित केली जात होती. जलसंपदा विभागाच्या ओलोरे यांत्रिक विभागाने कामाला गती दिली. दररोज सुमारे दोनशे ब्रास गाळउपसा सुरू होत होता.

पावसाळा पूर्णपणे सुरुवात होईपर्यंत हे काम सुरू होते. परंतु पावसाळा सुरू झाल्यावर काम थांबले. मात्र, निधी मंजूर असल्याने हे काम नोव्हेंबर २०२४ मध्ये सुरू होईल, अशी अपेक्षा होती. परंतु निवडणुका व अन्य कामांमध्ये यंत्रणा गुंतून पडल्या व गाळ काढण्याच्या कामाला मार्च २०२५ उजाडला तरी आरंभ झाला नाही. गेल्या वर्षी सुमारे पाच हजार घनमीटरपेक्षा जास्त गाळ उपसा करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या कामासाठी अलोरे जलसंपदा यांत्रिकी विभागातर्फे आगामी काही दिवसांत दोन पोकलेन यंत्र व काही डंपर वापरून गाळ उपसण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. यापूर्वी नदीपात्रातून उपसण्यात आलेला गाळ न.प. च्या हद्दीतील राखीव भूखंडावर टाकण्यात आला आहे. गृहराज्य मंत्री योगेश कदम जगबुडी नदीतील गांळउपसा करून खेड शहराला पूरमुक्त बनवण्यासाठी आग्रही असून, या कामासाठी निधी कधीही कमी पडू देणार नाही, असे त्यांनी आश्वासन त्यांनी दिले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular