22.2 C
Ratnagiri
Monday, January 26, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeRajapurसीआरझेड उल्लंघनाच्या नोटीसांविरोधात ग्रामस्थ एकवटले - आ. राजन साळवी

सीआरझेड उल्लंघनाच्या नोटीसांविरोधात ग्रामस्थ एकवटले – आ. राजन साळवी

कारवाईची तंबी देण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये जोरदार खळबळ उडाली आहे. 

तालुक्याच्या पश्चिम किनारपट्टी भागातील ग्रामस्थांना महसूल प्रशासनाने सीआरझेड कायद्याच्या तरतुदीनुसार पाठवलेल्या कारवाईच्या नोटीसांविरोधात शनिवारी या ग्रामस्थांची आ. राजन साळवी यांच्यासमवेत बैठक झाली. महसूल प्रशासनाने सुमारे साडेचारशेहून अधिक ग्रामस्थांना कारवाईबाबत बजावलेल्या नोटिसांमुळे किनारपट्टी परिसरातील जनतेमध्ये जोरदार खळबळ उडालेली असतानाच आ. राजन साळवी यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. सीआरझेडच्या मुद्दयावर आपण जनतेच्या पाठीशी असल्याचे आ. साळवींनी ठणकावले. दरम्यान पाठविलेल्या नोटीसांना संबंधित गावातून एकत्रपणे लेखी स्वरूपातील उत्तरे शासनाला सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. येथील पंचायत समितीच्या किसान भवनात नोटीसा बजावण्यात आलेल्या ग्रामस्थांची विशेष बैठक शनिवारी झाली.

सीआरझेड अधिसूचित क्षेत्रातील सीआरझेड तरतूदींचा भंग करून उभारलेल्या बांधकामांसंदर्भात प्रशासनाने असंख्य ग्रामस्थांना कारवाईच्या नोटीसा धाडल्या आहेत. त्यापैकी प्रथम साडेचारशे ग्रामस्थांना तशा स्वरूपातील नोटीसा बजावण्यात आल्या असून इतरही अनेक ग्रामस्थांना नोटीसा बजावल्या जाणार असल्याची चर्चा आहे. सीआरझेड तरतुदींचा भंग करून बांधकामांसंदर्भात पाठविलेली नोटीस मिळाल्यापासून ६० दिवसांच्या आत लेखी खुलासा करायचा असल्याचे पाठविलेल्या नोटीसांत नमूद करण्यात आले असून राजापूर उपविभागीय अधिकारी यांच्या सहीने त्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. राजापूर तालुक्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील सीआरझेड कार्यक्षेत्र लागू होते अशा गावातील ग्रामस्थांना त्या नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. त्यामध्ये कारवाईची तंबी देण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये जोरदार खळबळ उडाली आहे.

 यासंदर्भात त्रस्त ग्रामस्थांनी आ.राजन साळवी यांची भेट घेऊन त्यांचे लक्ष वेधल्यानंतर आ. साळवींनी सीआरझेडसंदर्भात शनिवारची विशेष बैठक आयोजित केली होती.  यावेळी उबाठा शिवसेनेचे तालुकाप्रमुख कमलाकर कदम, माजी तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, अॅड. शशिकांत सुतार, दिवाकर आडविरकर उपस्थित होते. यांच्यासह उपस्थितांमधून फारूख साखरकर, दीपक पळसुले, राजन लाड, प्रसाद मांजरेकर, सुरेश पवार, प्रकाश नार्वेकर, विश्वास करगुटकर, श्रुती गोलतकर आदिंनी मुद्दे मांडताना चिंता व्यक्त केली. यावेळी अॅड. शशिकांत सुतार यांनी सीआरझेड संदर्भात सविस्तर माहिती देताना आलेल्या नोटीसांसंदर्भात कायदेशीर भूमिका मांडली व मुद्दयावर सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

RELATED ARTICLES

Most Popular