27.9 C
Ratnagiri
Sunday, June 8, 2025

गुकेश – कार्लसनमध्ये विजेतेपदासाठी चुरस – नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा

बुद्धिबळ स्पर्धेतील खुल्या विभागात अखेरच्या फेरीपर्यंत कमालीची...

रत्नागिरीत गांजा विक्रीसाठी आलेल्या तरूणाला पकडले…

पांढरा समुद्र परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला...

उध्दव ठाकरेंचे मनसेसोबत युतीचे स्पष्ट संकेत…

गेल्या दीड महिन्यांपासून उद्धव आणि राज ठाकरे...
HomeMaharashtraरिफायनरी प्रकल्पाला जिथे विरोध होणार नाही, तिथे प्रकल्प होऊ शकतो – खास....

रिफायनरी प्रकल्पाला जिथे विरोध होणार नाही, तिथे प्रकल्प होऊ शकतो – खास. विनायक राउत

रत्नागिरीमध्ये होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाला आत्ता शिवसेनेकडून समर्थन मिळू लागले आहे. अनेक वर्ष रिफायनरी प्रकल्पासाठी असलेला विरोध आता मावळलेला दिसून येत आहे. दोन आठवड्यापूर्वी शिवसेनेचे युवा नेते आणि राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी सिंधुदुर्ग दौऱ्‍याच्यावेळी रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्रातच होईल, असे सुस्पष्टपणे जाहीर केले होते. मात्र, जागेचा शोध घेणे सुरु आहे, ती अजून निश्‍चित झालेली नाही, असे सांगितले होते.

रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी रविवारी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना सांगितले कि, नाणार वगळता रिफायनरी प्रकल्पाला जिथे विरोध होणार नाही,  तेथे हा प्रकल्प होऊ शकतो,  असे प्रतिपादन केले आहे. रिफायनरीला नाणारमधील जनतेचा अजूनही विरोध असल्याने शिवसेनेने देखील या प्रकल्पाला विरोध केला होता. करण जनतेला नाराज करून अथवा त्यांच्या मनाविरुद्ध तिथे प्रकल्प लादणे शिवसेनेला पटत नाही. त्यामुळे सध्या बारसू येथे हा प्रकल्प उभारण्यासाठी जोरदार समर्थन मिळत आहे. केंद्रीय पथक राजापुरात पाहणीसाठी येणार असून, सेनेचा विरोधाचा कडवा आवाज आता हळूहळू कमी झालेला दिसत असताना हा प्रकल्प बारसू येथेच होण्याचे संकेत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

राजापूर तालुक्यातील बारसू गावात रिफायनरी प्रकल्पासाठी सर्वेक्षण केले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर विनायक राऊत यांना विचारणा केली असता, त्यांनी ग्रामस्थांचा विरोध नसेल तेथे हा प्रकल्प होऊ शकतो, असे पत्रकारांना स्पष्ट सांगितले आहे. रिफायनरी प्रकल्पाबाबत जी भूमिका स्थानिक ग्रामस्थांची असेल, तीच शिवसेनेची राहील, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे ज्या गावातून या प्रकल्पासाठी सकारात्मकता दिसून येईल त्या ठिकाणी हा प्रकल्प उभारण्यात येईल.

RELATED ARTICLES

Most Popular