26.4 C
Ratnagiri
Tuesday, June 24, 2025

रत्नागिरी नगरपरिषदेत सत्ता मिळविण्यासाठी राजकीय डावपेच…

रत्नागिरी नगर परिषद निवडणूकीचे मतलई वारे आता...

विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरच्या चौकशीचे आदेश…

खेड तालुक्यातील तळे कासारवाडी येथे नुकत्याच दहावी...

चिपळूण-कऱ्हाड मार्ग अवजड वाहनांसाठी बंदच…

कोयना ते पाटणदरम्यानच्या पुलाचे बांधकाम सुरू असताना...
HomeChiplunना. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत विनोद झगडेंचा शिवसेनेत प्रवेश

ना. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत विनोद झगडेंचा शिवसेनेत प्रवेश

कार्यकर्त्यांसह शिवसेनेचा धनुष्यबाण स्वीकारून पक्षात जाहीर प्रवेश केला.

तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख विनोद झगडे यांनी सोमवारी आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या समवेत ठाणे येथे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत, चिपळूण-संगमेश्वरचे माजी आमदार डॉक्टर सुभाष बने, जि.प.चे माजी अध्यक्ष रोहन बने यांनी हा प्रवेश होण्यासाठी विशेष पुढाकार घेतला होता. दरम्यान विनोद झगडे यांच्या शिवसेना पक्षप्रवेशामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला चिपळूण तालुक्यात मोठा धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे. ठाणे येथे उबाठाचे चिपळूणचे माजी तालुकाप्रमुख आणि माजी जि.प. सभापती विनोद झगडे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेचा धनुष्यबाण स्वीकारून पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह बाळासाहेब शिंदे, प्रसाद लाड, सचिन बामणे, सुधीर कदम,सतीश शिंदे, सुरेश गोलमडे यांचासह ६० पदाधिकारी आणि अनेक कार्यकर्त्यांचा समावेश होता. या ऐतिहासिक पक्षप्रवेशासाठी ११० गाड्यांचा भव्य ताफा घेऊन झगडे समर्थकांनी मुंबईत धडक दिली.

राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत ह्यांच्या उपस्थितीत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. ना. एकनाथ शिंदे ‘यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीत परिवर्तनाची सुरुवात झाली असून या प्रवेशामुळे रत्नागिरीतील शिवसेनेचे ताकद वाढली असून शिंदे साहेबांचे बळ अधिक वाढणार आहे, असे यावेळी ना. उदय सामंत यांनी म्हटले. या सोहळ्याला माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार सुभाष बने, रोहन बने यांच्यासह शेकडो शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेनेत प्रवेश केलेल्या विनोद झगडे व त्यांच्यासोबत आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना शिवसेना पक्षामध्ये सन्मानाची वागणूक मिळेल व विनोद झगडे यांच्या माध्यमातून आलेल्या प्रत्येक कामांना प्राधान्य दिले जाईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी यावेळी विनोद झगडे व समर्थक कार्यकर्त्यांना दिले.

RELATED ARTICLES

Most Popular