24.6 C
Ratnagiri
Sunday, November 23, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeSportsविराट कोहलीचा वेस्ट विंडीजच्या विजयावेळी पुष्पाचा “श्रीवल्ली” डान्स

विराट कोहलीचा वेस्ट विंडीजच्या विजयावेळी पुष्पाचा “श्रीवल्ली” डान्स

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली मैदानावर व्हायरल झालेला श्रीवल्ली डान्स करताना दिसला आहे.

दाक्षिणात्य रेकॉर्डब्रेक चित्रपट “पुष्पा” आणि त्यातील अनेक गाण्यांनी सगळ्या जगावर भुरळ घातली आहे. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत त्याची चित्रपटातील स्टेप्स मारतानाचे अनेक जणांचे व्हीडीयो सोशल मिडीयावर व्हायरल झालेले आपण पाहिले आहेत. या पुष्पा स्टेपची क्रेझ अगदी क्रिकेट पर्यंत पोहोचली आहे.

भारताने वेस्ट विंडीजवर विजय मिळताच भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली मैदानावर व्हायरल झालेला श्रीवल्ली डान्स करताना दिसला आहे. भारताने वेस्ट इंडीजला ४४ धावांनी पराभूत केले आहे. तसेच तीन सामन्याच्या मालिकेतील दोन सामने जिंकत मालिकेवर सुद्धा आपले नाव कोरले आहे.

विराट कोहली आणि डान्स हे एक चांगलेच जमणारे कनेक्शन आहे. क्रिकेटच्या मैदानावर देखील विराट नेहमी चाहत्यांचे फलंदाजीद्वारे मनोरंजन करत असतो. तर क्षेत्ररक्षण करताना मैदानावर वाजणाऱ्या गाण्यावर थिरकताना देखील दिसतो. यंदाही त्याने पुष्पा ट्रेंड बघता अल्लू अर्जुनच्या स्टाईलने “श्रीवल्ली” गाण्याची फेमस स्टेप केली आहे. विराटचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला दिसत आहे.

वेस्ट इंडीज विरुद्धच्या मालिकेत विराटला दोन्ही सामन्यात विशेष कामगिरी करता आलेली नाही. मागील अनेक महिन्यांपासून त्याच्या कारकिर्दीचे आणि कामगिरीबद्दल अनेक त्रुटी दिसून येत आहेत. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये विराटच्या कामगिरीबद्दल चिंता निर्माण होत आहे. विराट कोहलीची कामगिरी  अनेक दिवसांपासून खराब होत आहे. चांगल्या कामगिरीबद्दल बघायला गेले तर दोन वर्षांआधी त्याचे शेवटचे शतक झाले होते. तेव्हा पासून चाहते प्रत्येक सामन्यात त्याच्या ७१व्या शतकाची वाट बघत आहेत, परंतु विराटचा परफॉरमंस दिवसेंदिवस खराब होत चाललेला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular